TRENDING:

एलियनच्या शोधासाठी गेलं नासाचं यान, साडेपाच वर्षे लागणार, काय आहे 'मिशन यूरोपा'?

Last Updated:

गुरुचा उपग्रह असलेल्या युरोपावरील प्रचंड महासागरात सजीव सृष्टीसाठी पूरक परिस्थिती आहे का याचा शोध या मोहिमेआंतर्गत नासाकडून घेतला जाणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
दिल्ली : परग्रहावर एलियन म्हणजेच परग्रहवासी असतात आणि ते पृथ्वीवरील माणसांच्या संपर्कात असतात असे दावे केले जातात. अनेकदा ते विवादास्पद ठरतात पण तरी असे दावे करणं सुरुच राहतं. पृथ्वीच्या कक्षेबाहेर मानवासारखे कोणी बुद्घिमान एलियन राहतात का? ते आपल्याला किंवा आपण त्यांना शोधू शकतो का? हे प्रश्न कितीही ‘बोअर’ वाटले तरी ते विचारले जातात. आता तर दस्तुरखुद्द ‘नासा’ ही एलियन्सच्या शोधासाठी सरसावली आहे. नासाने ‘मिशन युरोपा’ नावाची मोहिम हाती घेतली असून एलियनच्या शोधार्थ गुरु ग्रहावर अंतराळयान पाठवलं आहे.
News18
News18
advertisement

पृथ्वीव्यतिरिक्त अन्य ग्रहांवर सजीव राहतात का? एलियन खरोखरच असतात का? असे प्रश्न आपल्याला नवीन नाहीत. मंगळ ग्रहावर तसा शोध सुरु आहे. आता एलियनच्या शोधार्थ नासा सरसावली आहे. ‘मिशन युरोपा’ असं नासाच्या मोहिमेचं नाव आहे. गुरुचा उपग्रह असलेल्या युरोपावरील प्रचंड महासागरात सजीव सृष्टीसाठी पूरक परिस्थिती आहे का याचा शोध या मोहिमेआंतर्गत नासाकडून घेतला जाणार आहे. ‘युरोपा क्लिपर’ हे अंतराळयान एलियनच्या शोधार्थ गुरु ग्रहापर्यंत पोहोचण्यास सुमारे साडेपाच वर्षं लागणार आहेत.

advertisement

नासाचं ‘युरोपा क्लिपर’ हे गुरु ग्रहाच्या चारही बाजूंच्या कक्षेत प्रवेश करणार आहे. या कक्षेतील सुमारे डझनभर विकिरीत किरणांतून मार्ग काढत ते गुरुच्या जवळ पोहोचेल. युरोपाच्या बर्फाळ कवचाखाली एक प्रचंड महासागर आहे. तिथे सजीवसृष्टी असू शकते असा शास्त्रज्ञांचा कयास आहे. ‘स्पेसएक्स’ ने अंतराळयान पाठवलं असून ते 18 लाख मैल प्रवास करणार आहे. फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटरमधून हे यान प्रक्षेपित करण्यात आलं आहे. या मोहिमेवर सुमारे 5.2 बिलियन डॉलर खर्च होणार आहेत. हे यान 2030 पर्यंत युरोपाच्या जवळ पोहोचेल. युरोपाच्या पृष्ठभागापासून 16 मैलांपर्यंत ते पोहोचेल. चार वर्षांच्या काळात सुमारे 50 वेळा ते त्या पृष्ठभागाजवळून जाईल पण लॅंड करणार नाही.

advertisement

युरोपाच्या दिशेने पाठवण्यात आलेलं अंतराळयान अनेक अत्याधुनिक सोयींनी युक्त आहे. युरोपामधील स्पेक्टोमीटर त्याच्या पृष्ठभागाची रचना अभ्यासणार आहे. थर्मल कॅमेरामार्फत तेथील हॉट स्पॉट्सचा शोध घेतला जाणार आहे. तेथील मॅग्नेटिक फिल्ड आणि ग्रॅव्हिटीचा अभ्यासही केला जाणार आहे. तेथील बर्फाच्या थराची जाडी आणि महासागराची खोलीही मोजली जाणार असून जीवसृष्टीच्या अस्तित्वाला पुष्टी देणाऱ्या गोष्टी आढळल्यास अतिरिक्त अभ्यासासाठी नवीन मोहिमा हाती घेतल्या जातील.

advertisement

युरोपा क्लिपर हे नासाने आतापर्यंत पाठवलेलं सर्वात मोठं अंतराळयान आहे. त्याची मुख्य बॉडी एखाद्या एसयूव्हीच्या आकाराची आहे. एखाद्या बास्केटबॉल कोर्टपेक्षा मोठ्या आकाराची, सुमारे 100 फुटांची सोलर पॅनेल्सही त्याला लावण्यात आली आहेत. त्याच्या इलेक्ट्रॉनिक्समध्ये ॲल्युमिनियम झिंक वॉल्ट बसवण्यात आला आहे. त्यामुळे गुरुच्या रेडिएशनपासून यानाचं संरक्षण होईल.

शास्त्रज्ञांच्या मते युरोपावर 10 ते 20 मैल पसरलेला बर्फाचा महासागर आहे. पृथ्वीवरील सगळ्या महासागरांमधील पाण्याच्या दुप्पट पाणी तिथे आहे असाही त्यांचा अंदाज आहे. तिथे ज्वालामुखीचा स्फोट होतो असाही अंदाज आहे, त्यामुळे तिथे जीवसृष्टीचं अस्तित्व असेल अशी त्यांना आशा वाटते. युरोपा क्लिपर या अंतराळयानाची रचना मात्र तिथल्या जीवसृष्टीच्या शोधार्थ करण्यात आलेली नाही. यानाचा उद्देश तिथली ग्रॅव्हिटी, मॅग्नेशियम, भूगर्भीय हालचाली यांची माहिती घेणं हा आहे. त्या माहितीवरुन जीवसृष्टीला पूरक परिस्थिती आहे का याबाबत संशोधन होऊ शकतं.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
वाहन ब्लॅकलिस्ट टाळायचंय? काय होतात त्याचे परिणाम? संपूर्ण माहितीचा Video
सर्व पहा

1610 मध्ये गॅलेलिओ गॅलीली याने युरोपाचा शोध लावला. गुरुचे आणखी तीन उपग्रह गॅनीमेड, कॅलिस्टो आणि लो यांचा शोधही तेव्हा लागला. युरोपाचा आकार आपल्या चंद्राप्रमाणे आहे. त्याचा पृष्ठभाग बर्फाखालील पाण्यासाठी अनुकुल आहे. 1950-60 मध्ये काही अंतराळतज्ज्ञांनी युरोपाच्या बर्फाळ पृष्ठभागाखाली पाणी असल्याचा शोध लावला. 1970 च्या सुरुवातीला पायोनियर 10 आणि पायोनियर 11 ही स्पेसक्राफ्ट्स सर्वात आधी गुरुपर्यंत पोहोचली. नंतर व्हॉएजर एक आणि दोन यांनी 1979 मध्ये गुरुपर्यंत मोहीम केली. डिसेंबर 1997 मध्ये गॅलेलिओ स्पेसक्राफ्ट गुरुच्या 124 मैल जवळ पोहोचलं असता त्याच्या बर्फाळ पृष्ठभागाखाली पाणी असल्याच्या दाव्याला पुष्टी मिळाली.

मराठी बातम्या/विदेश/
एलियनच्या शोधासाठी गेलं नासाचं यान, साडेपाच वर्षे लागणार, काय आहे 'मिशन यूरोपा'?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल