पुरस्कार देणाऱ्या संस्थेने एका निवेदनात म्हटलं आहे, की फिजिक्समधल्या या वर्षीच्या दोन नोबेल पारितोषिक विजेत्यांनी सध्याच्या शक्तिशाली मशीन लर्निंगचा पाया असलेल्या पद्धती विकसित करण्यासाठी फिजिक्समधल्या टूल्सचा वापर केला आहे.
पुरस्कार विजेत्याला 11 मिलियन स्वीडिश क्राउन्स (1.1 मिलियन डॉलर्स) दिले जातात. विजेते एकापेक्षा जास्त असतील तर बक्षिसाची रक्कम वाटून दिली जाते. फिजिक्ससाठीचा नोबेल पुरस्कार रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसतर्फे दिला जातो. दिवंगत आल्फ्रेड नोबेल यांच्या इच्छेनुसार, दर वर्षी विज्ञान, साहित्य आणि शांतता क्षेत्रातल्या कामगिरीसाठी हे पुरस्कार दिले जातात. हे सर्वांत प्रतिष्ठित पुरस्कार आहेत.
advertisement
काही अपवाद वगळता 1901पासून दर वर्षी हे पुरस्कार दिले जात आहेत. डायनामाइटचा शोध लावणारे स्वीडिश शास्त्रज्ञ, उद्योगपती आणि दानशूर आल्फ्रेड नोबेल यांच्या इच्छेनुसार त्यांच्या स्मरणार्थ दिलेल्या जाणाऱ्या या पुरस्कारांत नंतर अर्थशास्त्राचा समावेश करण्यात आला.
शांतता आणि साहित्य या विषयातल्या नोबेल पारितोषिकांसाठी निवडल्या जाणाऱ्या व्यक्तींवरून काही वेळा वाद होतात; मात्र भौतिकशास्त्राच्या पारितोषिकासाठी निवडलेल्या व्यक्तींची मोठी चर्चा होते. फिजिक्समध्ये नोबेल विजेत्यांच्या यादीत अल्बर्ट आइनस्टाइन, नील्स बोहर आणि एनरिको फर्मी यांसारख्या प्रसिद्ध शास्त्रज्ञांचा समावेश आहे.
गेल्या वर्षी फिजिक्समधलं नोबेल पियरे अगोस्टिनी, फेरेंक क्रॉझ आणि ॲन ल'ह्युलियर यांना देण्यात आलं होतं. अणूंमधल्या बदलांचा स्नॅपशॉट देणाऱ्या आणि संभाव्य आजाराची माहिती शोधण्यात मदत करू शकणाऱ्या अल्ट्रा-शॉर्ट पल्स त्यांनी तयार केल्या होत्या. त्यामुळे त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार दिला गेला होता.
