अॅनी 3 वर्षांची आणि सॅम 12 वर्षांचा असताना हा छळ सुरू झाला होता. मिसुरी येथील त्यांच्या घरी हा प्रकार घडला ज्याचा मानसिक त्रास आयुष्यभर सहन करावा लागल्याचे तिने असे तक्रारीत म्हटले आहे. सॅम ऑल्टमन यांच्या विरोधात दाखल झालेला पहिला खटला आहे. पण याआधी अॅनीने सोशल मीडियाच्या माध्यमातून अशाच प्रकारचे आरोप केले होते. 2021 मध्ये तिने एक्सवर पोस्ट करून तिच्या सख्ख्या भावांकडून विशेषतः सॅमकडून लैंगिक, शारीरिक, मानसिक आणि तंत्रज्ञानाचा गैरवापर झाल्याचा आरोप केला होता.
advertisement
...तर भारतातील ९९% लोक दुसऱ्या दिवशी कामावर जाणार नाहीत
या तक्रारीत अॅनीने मानसिक आरोग्यावर झालेल्या गंभीर परिणाम झाल्याचे म्हटले आहे. ज्यामध्ये PTSD, नैराश्य आणि जीवनातील आनंद गमावणे अशा गोष्टींचा समावेश आहे. तिने या प्रकरणाची ज्यूरीमार्फत सुनावणीची आणि तसेच 75,000 डॉलर्सपेक्षा अधिक नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
आणखी एका भारतीय क्रिकेटपटूचा संसार मोडला? पत्नीचे फोटो डिलिट,अनफॉलो केले
सॅम ऑल्टमन व कुटुंबाची प्रतिक्रिया
दरम्यान अॅनीने केलेल्या या आरोपानंतर सॅम ऑल्टमन आणि त्यांच्या कुटुंबीयांनी एका निवेदनाद्वारे हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आमच्या कुटुंबाविषयी विशेषतः सॅमविषयी केलेले आरोप खोटे आहेत.तिच्या गोपनीयतेचा आदर करण्यासाठी आम्ही यावर सार्वजनिकरित्या उत्तर दिले नव्हते. आता कायदेशील कारवाई केल्याने आम्ही यावर भाष्य केल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
