जियो न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, रेल्वे स्टेशनच्या बूकिंग कार्यालयात स्फोट झाला. ट्रेन पोहोचण्याच्या काही वेळ आधी ही घटना घडली. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, जाफर एक्स्प्रेस सकाळी ९ वाजता पेशावरला जाणार होती. स्टेशनवर असलेली गर्दी पाहता मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे.
बलूच लिबरेशन आर्मीने या स्फोटाची जबाबदारी घेतलीय. बलूच लिबरेशन आर्मीने म्हटलं की, आम्ही क्वेटा रेल्वे स्टेशनवर पाकिस्तानी लष्करावर झालेल्या आत्मघाती हल्ल्याची जबाबदारी घेतो. क्वेटाा रेल्वे स्टेशनवर पाकिस्तानी लष्कराच्या एका युनिटवर हल्ला केला. ते इन्फट्री स्कूलचा कोर्स पूर्ण करून जाफर एक्सप्रेसमधून परतत होते.
advertisement
बलूचिस्तान सरकारचे प्रवक्ते शाहिद रिंद यांनी सांगितलं की, पोलीस आणि सुरक्षा दल घटनास्थळी दाखल झाले आहे. स्फोटाच्या घटनेची सखोल चौकशी केली जात आहे. बॉम्ब शोध पथक घटनास्थळी पुरावे गोळा करत आहे. या घटनेचा अहवाल मागवण्यात आलाय.
सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितलं की, रुग्णालयात इमर्जन्सी लागू केली. जखमींवर तातडीने उपचार केले जात असून त्यांना आवश्यक ती मदत केली जात आहे. रेल्वे स्टेशनवरील फूटेजमध्ये स्फोटानंतरचं विदारक दृश्य दिसत आहे. स्फोटावेळी एक ट्रेन प्लॅटफॉर्मवर पेशावरला जाण्यासाठी थांबली होती.
