भारत सरकारने सिंधू जल करारासंदर्भात घेतलेल्या ताज्या निर्णयामुळे पाकिस्तान सरकारची अडचण झाली आहे. भविष्यातील पाण्याच्या संकटाचा अंदाज घेत त्यांनी भारताकडे या निर्णयावर पुनर्विचार करण्याची कळकळीची विनंती केली आहे.
बलुचिस्तानमधून आली मोठी बातमी, BLAने केली पाकिस्तानच्या प्याद्याची शिकार
सैय्यद अली मुर्तुजा यांनी भारतातील जलशक्ती मंत्रालयाच्या सचिवांना एक अधिकृत पत्र लिहून भारत सरकारकडून सिंधू जल करारासंदर्भात घेतलेल्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. या पत्रात त्यांनी भारताला विनंती केली आहे की, या निर्णयाचा भविष्यातील परिणाम गंभीर असू शकतो आणि त्यामुळे भारताने या निर्णयावर पुन्हा एकदा विचार करावा.
advertisement
भारत आणि पाकिस्तान यांच्यात १९६० मध्ये सिंधू नदी पाण्याच्या वाटपासंदर्भात एक ऐतिहासिक करार झाला होता. जो वर्ल्ड बँकेच्या मध्यस्थीने घडवून आणला गेला होता. या करारानुसार सिंधू प्रणालीतील काही नद्या भारतासाठी आणि काही पाकिस्तानसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या. मात्र पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने नवीन धोरणात्मक भूमिकेमुळे पाकिस्तानमध्ये चिंता वाढली आहे.
काश्मीरमध्ये थरारक मोहीम; पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याला शोधून ठोकले
भारत सरकारने अलीकडेच या करारातील काही अटींचा पुनर्विचार करण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे पाकिस्तानने तातडीने प्रतिक्रिया देत, भारताशी पत्राद्वारे संपर्क साधून त्यांना भविष्यातील संभाव्य संकटांची जाणीव करून दिली आहे. सैय्यद अली मुर्तुजा यांच्या म्हणण्यानुसार, या निर्णयामुळे पाकिस्तानमधील जलसंकट अधिक गडद होऊ शकते, ज्याचा थेट परिणाम शेतकरी, उद्योग आणि सर्वसामान्य नागरिकांवर होईल.
