बलुचिस्तानमधून आली मोठी बातमी, BLAने केली पाकिस्तानच्या प्याद्याची शिकार; मुल्ला शरीफचा खात्मा
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Balochistan Liberation Army: बलुचिस्तानमध्ये मुल्ला शरीफ याला ठार मारून बलूच लिबरेशन आर्मीने (BLA) पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे. या घटनेची जबाबदारी स्वीकारत BLA ने पाकिस्तानी सैन्याला कठोर इशारा दिला आहे. ज्यामुळे तणाव आणखी वाढला आहे.
ग्वादर: पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील ग्वादर जिल्ह्यातील जिवानी भागात बलूच लिबरेशन आर्मी (BLA) ने मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यात त्यांनी मुल्ला शरीफ याला ठार मारल्याचा दावा केला आहे. मुल्ला शरीफबद्दल बीएलएने एक अधिकृत निवेदन जारी केले आहे. ज्यामध्ये शरीफला पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थांचा मोठा खबरी असल्याचे म्हटले आहे. बीएलएने जिवानीतील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारताना याला पाकिस्तानी कब्जा विरोधातील त्यांच्या लढ्याचा महत्त्वाचा भाग असल्याचे सांगितले आहे.
बीएलएच्या निवेदनानुसार, मुल्ला शरीफ गेल्या दशकापासून पाकिस्तानची मिलिट्री इंटेलिजेंस (MI), कोस्ट गार्ड आणि इतर सुरक्षा दलांसाठी हेरगिरी करत होता. निवेदनात असा दावा करण्यात आला आहे की तो बलूच तरुणांना जबरदस्तीने गायब करणे, लष्करी कारवायांदरम्यान स्थानिक लोकांकडून गुप्त माहिती गोळा करणे आणि बलूच जनतेला आर्थिकदृष्ट्या दाबणे यांसारख्या गंभीर प्रकरणांमध्ये सामील होता.
advertisement
कोण होता मुल्ला शरीफ?
मुल्ला शरीफ मूळचा बुलेदाचा रहिवासी होता. बीएलएच्या म्हणण्यानुसार, शरीफ बऱ्याच काळापासून जिवानीमध्ये राहून पाकिस्तानी सैन्यासाठी काम करत होता. बीएलएने त्याला मिलिट्री इंटेलिजेंसचा अधिकारी अब्दुल्ला लोढाना उर्फ उमर याचा जवळचा माणूस असल्याचे म्हटले आहे.
advertisement
बीएलएने आपल्या निवेदनात स्पष्टपणे सांगितले आहे की, जो कोणी बलूच पाकिस्तानी सैन्य किंवा त्यांच्याशी संबंधित संस्थांना मदत करताना आढळेल. मग तो त्यांच्यासोबत प्रवास करत असेल किंवा त्यांना वाहने पुरवत असेल त्याला कोणत्याही प्रकारची सवलत दिली जाणार नाही.
ट्रम्प यांना मिरची झोंबली, भारताकडून अमेरिकेच्या हुकमी एक्क्यावर घाव
बीएलएने असाही आरोप केला आहे की, वारंवार इशारा देऊनही काही लोक अजूनही कोस्ट गार्डसारख्या संस्थांना मदत करून ‘कब्जा करणाऱ्या शक्तींना’ मजबूत करत आहेत. मुल्ला शरीफची हत्या हे त्याचे उदाहरण असल्याचे सांगून यापुढे अशा प्रकारचे काम करणाऱ्या प्रत्येकाला असाच परिणाम भोगावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
advertisement
पाकिस्तानसाठी किती मोठा झटका?
हा हल्ला केवळ एका व्यक्तीला मारण्याचा प्रकार नाही तर पाकिस्तानची सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांसाठी ही एक मोठी अपयश आहे. जो माणूस अनेक वर्षांपासून सैन्यासाठी काम करत होता आणि ज्याची आतल्या माहितीपर्यंत पोहोच होती. त्याला लक्ष्य करणे हे दर्शवते की बीएलएची नेटवर्किंग आणि रणनीतिक तयारी किती खोलवर रुजलेली आहे.
advertisement
याशिवाय या हल्ल्यामुळे जिवानी आणि आसपासच्या भागात सैन्यासाठी मदत मिळवणे अधिक कठीण होऊ शकते. पाकिस्तानी सैन्य आधीच बलूच लढवय्यांच्या हल्ल्यांनी त्रस्त आहे. अशा परिस्थितीत जेव्हा त्यांच्या मदतनीसांना मारण्याची उघड धमकी दिली जात आहे आणि त्याचे उदाहरण समोर ठेवले गेले आहे. तेव्हा हे त्यांच्यासाठी या भागात नवीन संकट निर्माण करू शकते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 14, 2025 4:15 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
बलुचिस्तानमधून आली मोठी बातमी, BLAने केली पाकिस्तानच्या प्याद्याची शिकार; मुल्ला शरीफचा खात्मा


