हा तर भारताचा 'Clear cut' विजय; जगातील सर्वात मोठ्या लष्करी तज्ज्ञाने पाकिस्तानची शिल्लक लाज काढली

Last Updated:

Operation Sindoor : जगातील सर्वात प्रतिष्ठित लष्करी तज्ज्ञांपैकी एक असलेल्या टॉम कूपर यांनी पाकिस्तानच्या खोट्या दाव्यांचा पर्दाफाश केला आहे. 'ऑपरेशन सिंदूर' भारताचा स्पष्ट विजय असल्याचे सांगत पाकिस्तानने शस्त्रसंधीसाठी याचना का केली, याचेही त्यांनी विश्लेषण केले आहे.

News18
News18
नवी दिल्ली: 'ऑपरेशन सिंदूर'मुळे बिथरलेल्या पाकिस्तानच्या पोकळ आणि खोट्या दाव्यांवर ऑस्ट्रेलियाचे लष्करी तज्ज्ञ टॉम कूपर यांनी शहबाज शरीफ सरकारला आरसा दाखवला आहे. त्यांनी ३-४ दिवस चाललेल्या कारवाईला केवळ भारताचा विजय म्हटले नाही, तर पाकिस्तानने शस्त्रसंधीसाठी याचना करणे यात काही आश्चर्य नाही. कारण त्याला इतके मोठे नुकसान झाले होते की तो पूर्णपणे घाबरला होता, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
टॉम कूपर हे जगातील सर्वात प्रतिष्ठित युद्ध इतिहासकारांपैकी एक आहेत. ते विश्लेषक, लेखक आणि मध्य पूर्व ते दक्षिण आशियापर्यंतच्या हवाई युद्धांचे तज्ज्ञ आहेत. ६ आणि ७ मे च्या दरम्यानच्या रात्री पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानने भारतातील अनेक शहरांमधील लष्करी तळांवर हल्ले करण्याचा निष्फळ प्रयत्न केला. भारतानेही त्याच्या या कारवाईला जोरदार प्रत्युत्तर दिले. एका आठवड्याच्या या घडामोडींवर टॉम कूपर यांनी एक ब्लॉग लिहिला आहे.
advertisement
ट्रम्प यांना मिरची झोंबली, भारताकडून अमेरिकेच्या हुकमी एक्क्यावर घाव
टॉम कूपर यांनी स्पष्टपणे सांगितले की भारतीय सैन्यासमोर पाकिस्तानी सैन्य टिकू शकले नाही. ते म्हणाले की भारताने पाकिस्तानात घुसून ज्या प्रकारे विध्वंस केला, तो पाकिस्तानचा पराभव दर्शवतो. याच कारणामुळे तो शस्त्रसंधीसाठी अमेरिकेकडे याचना करत पोहोचला होता. त्यांनी भारताच्या या संपूर्ण अभियानाला स्पष्ट विजय असल्याचे म्हटले आहे.
advertisement
टॉम कूपर यांनी ब्लॉगमध्ये लिहिले, स्पष्टपणे सांगायचे तर जसे मी नेहमी करतो. जेव्हा एक पक्ष दुसऱ्याच्या अणुबॉम्ब साठवणुकीच्या ठिकाणी बॉम्ब टाकतो आणि दुसरा काहीही करण्याच्या स्थितीत नसतो तेव्हा माझ्या मते हा स्पष्ट विजय आहे. इस्लामाबादकडून शस्त्रसंधीसाठी याचना करणे यात काही आश्चर्य नाही.
शस्त्रसंधी उल्लंघन, Indian Armyने पाकची चौकी उडाली; 20 दहशतवाद्यांचा खात्मा
भारत या कारवाईत पाकिस्तानपेक्षा खूप वरचढ होता आणि भारताचा थेट विजय झाला.'ऑपरेशन सिंदूर'मध्ये किमान पाच प्रमुख दहशतवादी मारले गेले आणि १४० इतर दहशतवाद्यांचा खात्मा झाला. पाकिस्तान सरकारने यावर चुप्पी साधली, पण आयएसआयने या दहशतवाद्यांना शहीद ठरवून पाक लष्कराच्या अधिकाऱ्यांसोबत शासकीय सन्मान दिला. जे हे दर्शवण्यासाठी पुरेसे आहे की दहशतवाद्यांचे सैन्याशी थेट संबंध आहेत, असे टॉम कूपर यांनी म्हटले आहे.
advertisement
टॉम कूपर यांनी लिहिले की, भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी केलेली कारवाई पूर्णपणे यशस्वी झाली आणि पाकिस्तान नापास झाला. भारताने केवळ दहशतवादी छावण्यांवरच हल्ला केला नाही. तर पाकिस्तानच्या हल्ल्यांनाही कुशलतेने रोखले. पाकिस्तानचे हल्ले भारताच्या हवाई सुरक्षा प्रणाली एस-४००, बराक, आकाश, स्पायडर आणि बोफोर्सला भेदू शकले नाहीत.
सरकारी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन थेट होणार....; इतकी मिळणार Pay Hike की....
टॉम कूपर यांनी सिंधू पाणी करार स्थगित करण्यावरही भाष्य केले आहे. ते म्हणाले की भारताने पाणी थांबवले आणि पाकिस्तान काहीही करू शकला नाही. तर ही त्याच्यासाठी 'रेड लाइन' होती. पाकिस्तानने काहीही शिकले नाही आणि भारताने त्याच्या धमक्यांना गांभीर्याने घेणे बंद केले आहे, हेही त्याला समजले नाही. याशिवाय भारताने पाकिस्तानमधील रावळपिंडी आणि कराचीसारख्या महत्त्वाच्या शहरांमधील एचक्यू-९ हवाई सुरक्षा प्रणालीही उद्ध्वस्त केली आणि अखेरीस पाकिस्तान बॅकफुटवर आला आणि त्याला स्वतः भारताशी बोलून शस्त्रसंधीची मागणी करावी लागली. टॉम कूपर यांच्या वृत्तांकनाने पाकिस्तानचे दावे आणि जमिनीवरील सत्य यांच्यातील फरक संपूर्ण जगासमोर उघड केला आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
हा तर भारताचा 'Clear cut' विजय; जगातील सर्वात मोठ्या लष्करी तज्ज्ञाने पाकिस्तानची शिल्लक लाज काढली
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement