APMC Market Rate: मकरसंक्रांतीला मार्केट 'कडू', शेवग्याचे भाव गगनाला भिडले; इतर भाजीपाल्यांची काय स्थिती?
- Reported by:Priti Nikam
- local18
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
सोमवार, दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये गुळ, शेवगा आणि डाळिंबाची आवक व भाव पाहू.
मुंबई: सोमवार, दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये गुळ, शेवगा आणि डाळिंबाची आवक व भाव पाहू.
गुळाची आवक दबावात: राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 1525 क्विंटल गुळाची आवक झाली. यापैकी पुणे मार्केटमध्ये 454 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 4313 ते 4426 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच मुंबई मार्केटमध्ये आवक झालेल्या 354 क्विंटल गुळास जास्तीत जास्त 5450 रुपये सर्वाधिक सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.
शेवग्याच्या आवकेत घट: राज्याच्या मार्केटमध्ये आज 228 क्विंटल शेवग्याची आवक झाली. यापैकी मुंबई मार्केटमध्ये सर्वाधिक 185 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 12000 ते 16000 रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 10 क्विंटल शेवग्यास 21500 रुपये सर्वात जास्त बाजारभाव मिळाला.
advertisement
डाळिंबाचे भाव: आज राज्याच्या मार्केटमध्ये 1422 क्विंटल डाळिंबाची एकूण आवक झाली. यापैकी 896 क्विंटल सर्वाधिक आवक नागपूर मार्केटमध्ये राहिली. त्यास सर्वसाधारण 5000 रुपये सर्वात कमी बाजारभाव मिळाला. तसेच छत्रपती संभाजीनगर मार्केटमध्ये आवक झालेल्या 8 क्विंटल डाळिंबास प्रतीनुसार 14000 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
Location :
Maharashtra
First Published :
Jan 12, 2026 10:01 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
APMC Market Rate: मकरसंक्रांतीला मार्केट 'कडू', शेवग्याचे भाव गगनाला भिडले; इतर भाजीपाल्यांची काय स्थिती?








