Video: शस्त्रसंधी उल्लंघन, Indian Armyने पाकची चौकी उडाली; 10 जवानांसह 20 दहशतवाद्यांचा खात्मा
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Indian Army: जम्मू विभागातील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून झालेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला भारतीय लष्कराने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. या कारवाईत 10-12 पाकिस्तानी जवान आणि 15-20 दहशतवादी मारले गेले आहेत.
जम्मू: जम्मू विभागातील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून झालेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला भारतीय लष्कराने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. या कारवाईचा व्हिडिओ देखील प्रथमच समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय लष्कराच्या अचूक मारक क्षमतेमुळे अनेक पाकिस्तानी पोस्ट आणि ठिकाणे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली दिसत आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय लष्कराने केलेल्या या प्रत्युत्तरात सुमारे 10 ते 12 पाकिस्तानी लष्करी जवान आणि सुमारे 15 ते 20 दहशतवादी मारले गेले आहेत. भारतीय लष्कराने या भागात जोरदार कारवाई करत शत्रूला चोख प्रत्युत्तर दिले आहे.
पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवर विनाकारण शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. यानंतर भारतीय लष्कराने त्वरित आणि प्रभावी कारवाई करत शत्रूच्या ठिकाणांना लक्ष्य केले. पाकिस्तानी सैन्याच्या अनेक बंकर आणि इतर बांधकामे पूर्णपणे नष्ट झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. भारतीय जवानांनी अचूक लक्ष्य साधत शत्रूला मोठा फटका दिला आहे.
advertisement
भारतीय लष्कराच्या कारवाईचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
भारतीय लष्कराच्या या कारवाईमुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानला भारताने स्पष्ट संदेश दिला आहे की, अशा कोणत्याही कृत्यांना कठोर प्रत्युत्तर दिले जाईल. भारतीय लष्कर आपल्या सीमेचे रक्षण करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे आणि कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सक्षम आहे. हे या कारवाईतून दिसून आले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 13, 2025 9:02 PM IST
मराठी बातम्या/देश/
Video: शस्त्रसंधी उल्लंघन, Indian Armyने पाकची चौकी उडाली; 10 जवानांसह 20 दहशतवाद्यांचा खात्मा