Ratnagiri News : जम्मू-काश्मीरमधील मोस्ट वॉन्टेड आरोपीला दापोलीतून अटक, नेमकं प्रकरण काय?

Last Updated:

जम्मू-काश्मीरमधील एका मोस्ट वॉन्टेड आरोपीला दापोलीतून अटक करण्यात यश आले आहे.मुस्ताक अहमद वाणी (वय 45) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

Ratnagiri News
Ratnagiri News
Ratnagiri News : शिवाजी गोरे, रत्नागिरी (दापोली)प्रतिनिधी : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत जम्मू-काश्मीरमधील एका मोस्ट वॉन्टेड आरोपीला दापोलीतून अटक करण्यात यश आले आहे.मुस्ताक अहमद वाणी (वय 45) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. जम्मू काश्मीर पोलीस आणि दापोली पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. या कारवाईनंतर जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. दरम्यान हे संपूर्ण प्रकरण काय आहे? हे जाणून घेऊयात.
मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधला एका मोस्ट वॉन्टेड आरोपी मुस्ताक अहमद वाणी हा जम्मू-काश्मीरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या गंभीर गुन्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून फरार होता. सन 2013 मध्ये जम्मू येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी वाणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून तो जम्मू आणि दिल्ली या परिसरामध्ये लपून राहत होता.अलीकडे तो दापोली तालुक्यातील आसूद येथे भाड्याच्या घरात राहत असल्याची गोपणीय माहिती जम्मू काश्मीर पोलिसांना मिळाली होती.
advertisement
वाणी दापोलीत असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच जम्मू पोलिसांचे एक पथक तात्काळ दापोलीत दाखल झाले.आरोपी मुस्ताक अहमद वाणी आपली गाडी एका स्थानिक गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी घेऊन आला असताना जम्मू आणि दापोली पोलिसांनी अचानक छापा टाकून त्याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.
अटक केल्यानंतर वाणीला खेड येथील न्यायालयात हजर करण्यात आले. आवश्यक कायदेशीर औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार जम्मू पोलिसांनी त्याला आपल्या ताब्यात घेतले. पुढील तपास आणि कायदेशीर कार्यवाहीसाठी जम्मू पोलिसांचे पथक आरोपीला घेऊन जम्मूकडे रवाना झाले आहे.या संपूर्ण कारवाईमध्ये दापोली पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर यांच्या पथकाचे विशेष सहकार्य लाभल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ratnagiri News : जम्मू-काश्मीरमधील मोस्ट वॉन्टेड आरोपीला दापोलीतून अटक, नेमकं प्रकरण काय?
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement