पाकिस्तान सरकारने जाहीर केलेल्या प्रमुख निर्णयांमध्ये हे समाविष्ट आहेत:
>इंडस जलसंधीचा भारताने केलेला निलंबन पाकिस्तानने फेटाळला असून कोणताही पाण्याचा प्रवाह वळविला गेला तर तो थेट युद्ध मानला जाईल.
>शिमला करार आणि सर्व द्विपक्षीय करार पाकिस्तानने तात्काळ निलंबित केले. जोपर्यंत भारत आपली भूमिका बदलत नाही.
भारताचं युद्धजन्य पाऊल, जगाच्या नजरा दिल्लीकडे; समुद्रातून 'सर्जिकल' इशारा
advertisement
>वाघा सीमास्थळ तात्काळ बंद. परत फक्त ३० एप्रिल २०२५ पर्यंतच परवानगी.
>भारतीय नागरिकांसाठी सर्व सार्क व्हिसा रद्द, केवळ शीख यात्रेकरूंना सूट; विद्यमान SVES व्हिसाधारकांना 48 तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश.
>भारतीय संरक्षण, नौदल आणि हवाई सल्लागारांना 'persona non grata' घोषित. 30 एप्रिलपर्यंत पाकिस्तान सोडण्याचे निर्देश; भारतीय उच्चायुक्तालयातील कर्मचारी संख्या 30 वर आणली.
>पाकिस्तानच्या हवाई हद्दीत भारतीय मालकीच्या कोणत्याही विमानाला प्रवेश बंदी.
>भारतासोबतचा सर्व व्यापार तात्काळ बंद. तिसऱ्या देशाद्वारे होणाऱ्या व्यापारासह.
>राष्ट्रीय सार्वभौमत्वावर कोणताही हल्ला झाल्यास ‘फुल-स्पेक्ट्रम’ प्रत्युत्तर देण्याची पाकिस्तानची घोषणा.
