भारताचं युद्धजन्य पाऊल, जगाच्या नजरा दिल्लीकडे; 'INS सुरत' कडून समुद्रातून 'सर्जिकल' इशारा, पाकिस्तान बिथरला

Last Updated:

भारताच्या 'INS सुरत' युद्धनौकेने अरब सागरात जबरदस्त क्षेपणास्त्र चाचणी करत पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे. पहलगाममधील अमानुष दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आता सामरिक पातळीवरही आक्रमक पवित्रा घेतला आहे.

News18
News18
नवी दिल्ली: भारतीय नौदलाच्या अत्याधुनिक 'INS सुरत' (D69) या विनाशिका युद्धनौकेने आज अरब सागरात एक अत्यंत महत्त्वाची चाचणी यशस्वीपणे पार पाडली. मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची (MRSAM) चाचणी करत समुद्राच्या पृष्ठभागाजवळून झेपावणाऱ्या लक्ष्यावर अचूक निशाणा साधण्यात आला. ही कामगिरी भारतीय नौदलाच्या हवाई संरक्षण क्षमतेचा ठसा उमटवणारी ठरली आहे.
आधुनिक हवाई धोके परतवण्याची क्षमता
या चाचणीत MRSAM क्षेपणास्त्राने कमी उंचीवरून येणाऱ्या आणि रडारला चुकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या लक्ष्याचा भेद केला. यामुळे 'INS सुरत' ही युद्धनौका आधुनिक काळातील हवाई आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांना प्रभावीपणे प्रत्युत्तर देऊ शकते, हे अधोरेखित झाले आहे.
INS सुरत – प्रकल्प 15बी अंतर्गत अखेरची युद्धनौका
'INS सुरत' ही प्रकल्प 15बी अंतर्गत तयार करण्यात आलेली चौथी आणि अंतिम स्टेल्थ विनाशिका युद्धनौका आहे. याचे नौदलात औपचारिक समावेश 15 जानेवारी 2025 रोजी करण्यात आला होता. या नौकेवर बसवलेले MRSAM क्षेपणास्त्र DRDO (भारत) आणि इस्रायली एअरोस्पेस इंडस्ट्रीज (IAI) यांच्या संयुक्त सहकार्याने विकसित करण्यात आले आहे. हे क्षेपणास्त्र विविध प्रकारच्या हवाई धोके – जसे की क्षेपणास्त्र, लढाऊ विमानं, मार्गदर्शित बॉम्ब आणि हेलिकॉप्टर – पेलण्यासाठी डिझाइन करण्यात आले असून त्याची कार्यक्षमता सुमारे 70 किलोमीटरपर्यंत असल्याचे मानले जाते.
advertisement
पहलगाम दहशतवादी हल्ला : 26 जण ठार
दरम्यान जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन खोर्‍यात झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्यामुळे भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव अधिकच वाढला आहे. या हल्ल्यात किमान 26 जणांचा मृत्यू झाला असून बहुतेक मृत व्यक्ती पर्यटक होते. चार दहशतवाद्यांनी एम-4 कार्बाईन आणि AK-47 रायफल्ससह पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या भयानक हल्ल्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र निषेध करण्यात आला आहे.
advertisement
पाकिस्तानची क्षेपणास्त्र चाचणीची तयारी
या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने 24-25 एप्रिल दरम्यान कराची किनाऱ्यालगतच्या त्यांच्या 'Exclusive Economic Zone' मध्ये जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी करण्याची घोषणा केली आहे. भारतीय संरक्षण यंत्रणा या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत, असे संरक्षण सूत्रांनी सांगितले.
भारताची तीव्र प्रतिक्रिया
हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानचे वरिष्ठ राजनैतिक अधिकारी तात्काळ तसदीने बोलावून निषेध नोंदवला आहे. तसेच पाकिस्तानच्या लष्करी राजनैतिक अधिकाऱ्यांना 'persona non grata' जाहीर करून देशाबाहेर पाठवले आहे. याशिवाय, 'इंडस वॉटर ट्रीटी' स्थगित करण्याचा निर्णय, अटारी सीमेवरील वाहतूक बंद करणे आणि SAARC व्हिसा सूट योजनेतून पाकिस्तानी नागरिकांना भारतप्रवासावर बंदी घालण्याचे निर्णयही घेण्यात आले आहेत.
view comments
मराठी बातम्या/देश/
भारताचं युद्धजन्य पाऊल, जगाच्या नजरा दिल्लीकडे; 'INS सुरत' कडून समुद्रातून 'सर्जिकल' इशारा, पाकिस्तान बिथरला
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement