लावरोव यांच्या या विधानामागे अमेरिका आणि पाश्चिमात्य शक्तींना एक मजबूत विरोधी गट उभा करण्याचा स्पष्ट उद्देश दिसतो. त्यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केले की RIC हा गट पुन्हा सक्रिय झाला. तर तो पश्चिमी प्रभावांना समोरासमोर टक्कर देऊ शकतो. हे विधान अशा काळात आले आहे. जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर “आगेशी खेळतोय” असे वक्तव्य करून सर्वांना धक्का दिला होता.
advertisement
सर्व काही गुपचुप सुरू आहे, फक्त 625 लोक वाचतील; तुमचे काय होणार, कुठे जाणार?
क्वाडवर टीका, भारताला इशारा
लावरोव यांनी क्वाड गटावर (भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान) जोरदार हल्ला चढवला. त्यांनी म्हटले की, क्वाड देश आर्थिक आणि व्यापार सहकार्याच्या नावाखाली चीनविरोधी लष्करी हालचाली करत आहेत. त्यांनी भारताला सूचक इशारा देत असेही सांगितले की, माझा विश्वास आहे की आमचे भारतीय मित्र क्वाडच्या या उकसवणाऱ्या खेळी समजून घेत असतील. हे सर्व चीनविरोधातील कटाचा भाग आहे.
RIC पुन्हा सुरू करणे शक्य?
भारत, रशिया आणि चीन यांच्यातील RIC गटाची सुरुवात 2006 साली झाली होती. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, चीनचे हू जिंताओ आणि पुतिन यांनी मिळून या गटाला प्रारंभ केला होता. पुढे हाच गट ब्रिक्ससाठी आधार ठरला. मात्र 2020 मधील गलवान संघर्षानंतर भारत-चीन संबंध ताणले गेले आणि RIC थांबले.
दरम्यान चीनकडून पाकिस्तानला अत्याधुनिक शस्त्रास्त्र पुरवण्याच्या हालचाली सुरु असल्यामुळे भारतासाठी या त्रिकोणात पुन्हा सामील होणे हे सहज शक्य दिसत नाही. पाकिस्तानला पाचव्या पिढीची फायटर जेट्स देण्याचा चीनचा विचार भारतासाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
25 हजार लोकांना ठार केले, हजारो लोक बेपत्ता; मोदीजी, Please मदत करा
भारताची संतुलनाची रणनीती
लावरोव यांच्या विधानांमुळे एक गोष्ट स्पष्ट होते की, रशिया पुन्हा चीनकडे झुकला आहे. पण भारत याकडे संतुलन राखत आहे. 1 ते 3 जून दरम्यान भारत युरोपीय संघासोबत हिंद महासागरात नौदल सराव करणार आहे. हा सराव सागरी चाचपणी, युद्धकौशल्य आणि संप्रेषण क्षमता वाढवण्यावर केंद्रित आहे. युरोपियन युनियनने याला "मुक्त आणि नियमाधारित सागरी व्यवस्था" म्हणून वर्णन केले आहे. मात्र रशियाला भारताचे हे पश्चिमाशी वाढते संबंध आपल्यासाठी धोका वाटत आहेत.
चीन-पाकिस्तान समीकरण
लावरोव RIC पुन्हा सुरू करण्याची मागणी करत असले, तरी भारताला हेही ठाऊक आहे की चीन पाकिस्तानला शस्त्र पुरवतो आहे आणि त्यामुळे भारताच्या सुरक्षेला धोका पोहोचतो आहे. त्यामुळे भारतासाठी मोठा प्रश्न असा आहे — तो अशा गटाचा भाग कसा होऊ शकतो. जिथे त्याच्या विरोधकाला (पाकिस्तानला) चीन पाठिंबा देत आहे?