एस जयशंकर म्हणाले की, विश्वास नाहीय किंवा सहकार्यात कमतरता आहे. जर मैत्री कमी झालीय शेजाऱ्यासारखं वागलं जात नसेल तर कारण शोधायला हवं. जयशंकर यांनी पाकिस्तानचं नाव न घेता स्पष्ट इशारा दिला. सीमेपलिकडून दहशतवात, फुटीरतावादाला खतपाणी घातलं गेलं तर व्यापार, उर्जेची देवाण-घेवाण आणि लोकांमध्ये संपर्क कसा वाढेल. कट्टरतावादाने कोणताही देश पुढे जात नाही. विकास आणि प्रगतीसाठी शांततेची गरज असल्याचं प्रतिपादन एस जयशंकर यांनी केलं.
advertisement
भारताकडून पाकिस्तानसोबतचे संबंध हे सामान्य रहावेत अशी इच्छा व्यक्त केली जाते पण यासाठी पाकिस्तानने दहशतवाद आणि हिंसामुक्त वातावरण तयार करणं गरजेचं आहे. जयशंकर यांनी हे वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या भेटीनंतर दुसऱ्या दिवशी केलं आहे. एससीओ परिषदेत भाग घेण्यासाठी जयशंकर पाकिस्तानात पोहोचले आहेत. त्यांनी त्यांच्याच देशात पाकिस्तानला थेट इशारा देत सीमेवर होणाऱ्या दहशतवादी कारवाया आणि फुटीरतावाद यामुळे व्यापार आणि संबंध वाढणार नसल्याचं म्हटलंय.
जयशंकर यांनी चीनलासुद्धा सुनावलंय. सीपीईसी प्रोजेक्टचा उल्लेख न करता जयशंकर म्हणाले की, जर आपण जगातील निवडक परंपरा विशेषत: व्यापार आणि व्यापारी मार्गांना निवडलं तर सदस्य देश प्रगती करू शकणार नाहीत. एससीओ सदस्य देशांचं सहकार्य परस्परांचा आदर आणि समानता याच्या आधारावर व्हायला हवं. त्यासाटी सर्व देशच्या अखंडता आणि स्वायत्तता याला मान्यता द्यायला हवी. यासाठी प्रत्यक्ष भागिदारी निर्माण व्हायला हवी. एकतर्फी अजेंड्यावर पुढे गेलं नाही पाहिजे.
