TRENDING:

भविष्यात कोविड-19 सारखा नवा व्हायरस येणार? दिला धोक्याचा इशारा

Last Updated:

साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, भविष्यात कोविडसारखा एक भयंकर व्हायरस येऊ शकतो, असं चिनी व्हायरॉलॉजिस्टनं म्हटलंय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली, 25 सप्टेंबर : कोरोना महामारीनं जगाला हादरवलं. कोविड-19 व्हायरसमुळे संपूर्ण जगातल्या आरोग्य व्यवस्थांचं कंबरडं मोडलं. गेल्या वर्षा-दीड वर्षापासून कोरोना महामारीचा प्रसार हळूहळू कमी होताना दिसतोय. मात्र ‘बॅटवुमन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘शी झेंगली’ या चिनी व्हायरॉलॉजिस्टनं आता पुन्हा एका नव्या व्हायरसबाबत धोक्याचा इशारा दिलाय.
(कोरोनाचा नवीन व्हेरिएंट)
(कोरोनाचा नवीन व्हेरिएंट)
advertisement

साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, भविष्यात कोविडसारखा एक भयंकर व्हायरस येऊ शकतो, असं चिनी व्हायरॉलॉजिस्टनं म्हटलंय. शी झेंगली या चिनी व्हायरॉलॉजिस्ट, प्राण्यांपासून निर्माण होणाऱ्या व्हायरसचा अभ्यास करतात. त्यांनी त्यांच्या रिसर्च पेपरमध्ये कोविडसारखा नवा भयंकर व्हायरस निर्माण होण्याबाबत सावधानतेचा इशारा दिला आहे.

कोविड व्हायरसमुळे आधी सार्स (SARS) आजार आणि नंतर कोरोना महामारी आली.

advertisement

वुहान इन्स्टिट्युट ऑफ व्हायरॉलॉजी इथल्या टीमनं कोरोनाच्या व्हायरसच्या 40 प्रजातींचा अभ्यास केला. माणसांमध्ये हे व्हायरस किती प्रमाणात पसरू शकतात, याबाबत त्यांनी संशोधन केलं. शी यांच्या संशोधनानुसार, त्या प्रजातींपैकी सहा व्हायरस धोकादायक आढळले आहेत. त्यापैकी 3 व्हायरसनी आधीच जगभरात धुमाकूळ घातला आहे. शी यांच्या अभ्यासानुसार इतर 3 व्हायरसनी प्राण्यांना मोठा धोका निर्माण केला आहे. त्यामुळे भविष्यात या व्हायरसपासून माणसांना धोका निर्माण होण्याची मोठी शक्यता आहे, असं संशोधन सांगतं. हा अभ्यास करताना व्हायरसचा परिणाम तपासताना आनुवंशिक भिन्नता, लोकसंख्या यांसारख्या गोष्टीही लक्षात घेतल्या गेल्या आहेत.

advertisement

WHO ने दिला मोठा अलर्ट! कोरोनापेक्षा 20 पट भयंकर 'हा' आजार

कोरोना व्हायरस चीनच्या वुहानमधील व्हायरॉलॉजी इन्स्टिट्युटमधून बाहेर आल्याचा आरोप आजपर्यंत अनेकांनी केला. त्याबद्दल निश्चित माहिती समोर आली नाही. मात्र चीनच्या त्या व्हायरॉलॉजी इन्स्टिट्युटबाबत शी यांच्या कामाबाबतही संशयाचं वातावरण आहे. अमेरिकेतल्या अनेक राजकीय नेत्यांनी कोविड व्हायरसच्या चीनच्या लॅबमधून झालेल्या उद्रेकाबाबत मतं व्यक्त केली आहेत. असं असलं तरी हा व्हायरस प्राण्यांमधून, विशेषतः वटवाघुळांमधून माणसांमध्ये आला या समजुतीबाबत अनेक संशोधक सकारात्मक आहेत. जून महिन्यात अमेरिकेच्या गुप्तचर विभागानं जाहीर केलेल्या कागदपत्रांनुसार, लॅबमधून व्हायरस बाहेर आल्याबाबत कोणताही पुरावा नसला, तरीही ही शक्यता फेटाळता येत नाही असं म्हटलं आहे.

advertisement

चीनच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रातील एका शास्त्रज्ञानं चीनच्या कोविड-19 परिस्थिती हाताळण्यामध्ये एक बदल नोंदवला आहे. चिनी अधिकारी कोरोना व्हायरसचं महत्त्व कमी करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. चीनमधल्या काही शहरांनी संसर्गाबाबतची माहिती जाहीर करणं थांबवलं आहे.

कोरोनासारखा आणखी एखादा जीवघेणा व्हायरस भविष्यात येऊ शकतो, असं चीनमधल्या संशोधकांचा अभ्यास सांगतो. मात्र त्याबद्दल असलेल्या संशयाच्या वातावरणामुळे त्याकडे किती गंभीरपणे पाहायचं हा मोठा प्रश्न आहे.

advertisement

मराठी बातम्या/विदेश/
भविष्यात कोविड-19 सारखा नवा व्हायरस येणार? दिला धोक्याचा इशारा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल