जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या स्फोटामुळे कराची एअरपोर्ट आणि आसपासच्या परिसरात तणावाचं वातावरण होतं. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. डॉन न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार रात्री उशिरा एअरपोर्टजवळ स्फोटाचे मोठे आवाज आले. त्यानंतर नेमकं काय घडलं ते पाहण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले.
एअरपोर्टजवळ आग आणि धुराचे लोळ दिसत होते. एअरपोर्टच्या बरोबर बाहेर एका टँकरमध्ये हा स्फोट घडवून आणण्यात आला. आतापर्यंत झालेल्या स्फोटातला हा सर्वात भयंकर आणि मोठा स्फोट असल्याचं मानलं जात आहे. बलूच लिबरेशन आर्मीने या स्फोटाची जबाबदारी घेतली आहे. वेहिकल बॉर्न इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोसिव डिवाइसचा वापर करुन स्फोट घडवून आणल्याचा दावा त्यांनी केला.
advertisement
चीनचे इंजिनियर आणि गुंतवणूकदार यांना टार्गेट करण्यासाठी हा स्फोट घडवून आणण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. हा स्फोट इतका भयंकर होता की त्याची झळ पोलीस अधिकाऱ्यांनाही बसली आहे. तेलाच्या टँकरमध्ये स्फोट घडवून आणल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पाकिस्तानच्या पोलीस अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जात आहे.
