सैफुल्लाहचे नाव अनेक गंभीर दहशतवादी हल्ल्यांमध्ये समोर आले होते. 2008 मध्ये रामपुरमधील सीआरपीएफ कॅम्पवरील हल्ला, 2006 मध्ये नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावरील हल्ला आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc), बेंगळूरु येथे झालेल्या बॉम्बस्फोटात त्याचा सहभाग होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील बदीन जिल्ह्यातील माटली तालुक्यात त्याला ठार मारण्यात आले. हा दहशतवादी म्होरक्या नेपाळच्या मार्गाने लष्कराच्या दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्यातही मदत करत होता.
advertisement
असा धडा शिकवला की येणाऱ्या पिढ्या लक्षात ठेवतील, पाकच्या 11 एअरबेसची राख; Video
आजम चीमा ऊर्फ बाबाजीचा होता खास माणूस
सैफुल्लाह हा लष्करच्या ऑपरेशनल कमांडर आजम चीमा ऊर्फ बाबाजीचा खास आणि विश्वासू सहकारी होता. नेपाळमध्ये तो विनोद कुमार या नावाने कार्यरत होता आणि त्याने नगमा बानू नावाच्या नेपाळी युवतीशी लग्नही केले होते. 2006 मध्ये नागपूरमधील संघ मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यात त्याची प्रमुख भूमिका होती. याशिवाय रामपुरमधील सीआरपीएफ कॅम्पवरील हल्ल्यातही त्याचा मोठा सहभाग होता. बंगळूरुमधील IISc वरील हल्ल्याच्या कटातही तो सामील होता.
बांगलादेश आज रात्रभर झोपणार नाही, भारताने मार्ग बंद केला; धमकी अंगलट आली
दहशतवाद्यांची भरती आणि फंडिंगचे काम करत होता
सध्या तो पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील माटली येथून आपल्या कारवाया करत होता आणि लष्करासाठी सतत नवीन दहशतवाद्यांची भरती करत होता. नेपाळमधून दहशतवादी सदस्यांची भरती करणे, त्यांच्यासाठी निधी (फंडिंग) आणि आवश्यक सामग्री (लॉजिस्टिक्स) पुरवणे, तसेच भारत-नेपाळ सीमेवरून होणाऱ्या हालचालींची जबाबदारी त्याच्यावर होती. त्याचे लष्करचे लॉन्च कमांडर आझम चीमा आणि लेखा प्रमुख याकूब यांच्याशी थेट संबंध होते. सैफुल्लाहच्या मारल्या जाण्याने भारतातील सुरक्षा यंत्रणांनी सुटकेचा श्वास घेतला आहे, कारण तो अनेक वर्षांपासून त्यांच्या रडारवर होता.
