मॉस्को भागात रामेंस्कॉय आणि कोलोमेन्स्की जिल्ह्यांसोबतच डोमोडेडोवो शहर, जे शहरातल्या सगळ्यात मोठ्या विमानतळापैकी एक आहे, मॉस्कोच्या दिशेने येणाऱ्या 34 ड्रोनना नष्ट केलं, अशी माहिती मॉस्कोचे महापौर सोबयानिन यांनी दिली आहे. रामेंस्कॉय जिल्हा मॉस्कोपासून जवळपास 45 किमी लांब आहे. युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यानंतर रशियातील हवाई वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.
रशियन मीडियाने ऑनलाइन प्रकाशित केलेल्या व्हिडिओमध्ये रामेंस्कोये जिल्ह्यातील एका घराला आग लागल्याचे दिसत आहे. रॉयटर्सने जवळपासच्या इमारतींचे स्थान आणि स्थिती, फुटपाथचा लेआउट आणि हल्ल्याच्या व्हिडिओवरून पुष्टी केली, जी सॅटलाईट इमेजशी जुळते.
advertisement
सप्टेंबर महिन्यात मॉस्को आणि आसपास झालेल्या ड्रोन हल्ल्यात रामेंस्कॉयमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता. युक्रेनने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झालेली रशियाची ही पहिलीच व्यक्ती होती. मे 2023 मध्येही क्रेमलिनजवळ दोन ड्रोन नष्ट करण्यात आले होते. त्याच वर्षी मॉस्को सिटी बिजनेस डिस्ट्रीक्टवरही ड्रोन हल्ले झाले होते.
