भारत आमचा मित्र देश आहे. परंतु त्यांनी नेहमीच अमेरिकेवर जास्त टेरिफ लावला. तसेच आयात शुल्काशिवाय इतर नियम देखील कडक आणि आम्हाला न आवडणारे आहेत. दुसरीकडे रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबावे, असे प्रयत्न होत असताना भारत रशियाकडून शस्त्रास्त्रे खरेदी करतो. आम्हाला हे मुळीच आवडलेले नाही. आता भारताला अमेरिकेला २५ टक्के आयात शुल्क द्यावे लागेल, अशी घोषणा करतानाच नवे नियम १ ऑगस्टपासून लागू होतील, असे ट्रम्प यांनी सांगितले.
advertisement
भारताला किती मोठा झटका?
भारताच्या उत्पादनांसाठी सर्वांत मोठी बाजारपेठ म्हणून अमेरिकेकडे पाहिले जाते. परंतु नव्याने जाहीर केलेल्या आयात शुल्काने भारताच्या टेक्सटाईल अर्थात कापड बाजार, दागदागिन्यांचे क्षेत्र (ज्वेलरी), वाहनांचे सुटे भाग (ऑटो पार्ट्स), औषधनिर्माण (फार्मा) आणि माहिती आणि तंत्रज्ञान अर्थात आयटी क्षेत्राला मोठा दणका बसणार आहे.
आधीच डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर होत आहे. ट्रम्प यांच्या आयात कर धोरणाने आता रुपया अधिक कमजोर होऊ शकतो. तसेच सध्याच्या अस्थिरतेच्या परिस्थिती गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदार तयार नाहीत. ट्रम्प यांच्या निर्णयाने गुंतवणूकदारांच्या मनोबलावर परिणाम होऊन ते गुंतवणूक करण्यास घाबरतील, अशी भीती तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. दुसरीकडे ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारतीय शेअर बाजाराला मोठा दणका बसेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
भारत हा सर्वांत जास्त आयात शुल्क लावणारा देश आहे. आता वेळ आली आहे त्यांच्यावरही तसेच कर लादण्याची. सरकारी नियम, परवानग्या तसेच भारताचे आयात शुल्काशिवाय इतर नियम देखील अतिशय कडक असल्याचे ट्रम्प म्हणाले.