TRENDING:

US Election Result : 270 आकडा गाठला तरी खुर्ची मिळवणं कठीण, बहुमतानंतरही होऊ शकतो पराभव

Last Updated:

US Election Result 2024 : कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अटीतटीची लढत सुरू आहे. जर पक्षाच्या विरोधात इलेक्टोरल मते गेली तर बहुमत मिळूनही राष्ट्राध्यक्षपदापासून दूर रहावं लागेल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक सुरू असून लवकरच नवा राष्ट्राध्यक्ष कोण असणार हे स्पष्ट होईल. सर्वात जुनी लोकशाही असलेल्या अमेरिकेत ट्रम्प पुन्हा बाजी मारणार की कमला हॅरीस इतिहास घडवणार याकडे जगाचं लक्ष लागून राहिलं आहे.अमेरिकेत बहुमताचा आकडा २७० इतका आहे. ज्या पक्षाला २७० इलेक्टोरल मते मिळतील त्यांचा उमेदवार राष्ट्राध्यक्ष होऊ शकतो. पण बहुमताचा आकडा गाठूनही राष्ट्राध्यक्ष होईलच याची खात्री देता येत नाही.
News18
News18
advertisement

अमेरिकेच्या संविधानानुसार इलेक्टोरल मत देणारे हे त्यांच्या विरोधी पक्षाच्या उमेदवारालासुद्धा मत देऊ शकतात. असं केल्यास त्यांच्यावर कोणती कारवाई होत नाही. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत असं घडलं आहे. कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अटीतटीची लढत सुरू आहे. जर पक्षाच्या विरोधात इलेक्टोरल मते गेली तर बहुमत मिळूनही राष्ट्राध्यक्षपदापासून दूर रहावं लागेल. बहुमत कुणालाही मिळालं तरी शेवटी राष्ट्राध्यक्ष कोण होणार यावर सस्पेन्स कायम राहिल. इलेक्टोरल सदस्य जोपर्यंत मतदान करत नाहीत तोपर्यंत बहुमत मिळवणाऱ्या पक्षाची धाकधूक कायम असते.

advertisement

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत इलेक्टोरल कॉलेजचा टप्पा सर्वात गुंतागुंतीचा असा आहे. सर्वसामान्य जनता राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ज्यांना मत देते ते इलेक्टोरल कॉलेज तयार करतात. इलेक्टोरल कॉलेज देशाच्या राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्षांची निवड करतात. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मंगळवारी त्यांना मतदान होतं जे राष्ट्राध्यक्षांची निवड करतील. त्यांना इलेक्टर्स म्हणतात. हे इलेक्टर्स निवडून आल्यानंतर १७ डिसेंबरला आपआपल्या राज्यात एकत्र येऊन पुन्हा राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्षांसाठी मतदान करतात.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
वाहन ब्लॅकलिस्ट टाळायचंय? काय होतात त्याचे परिणाम? संपूर्ण माहितीचा Video
सर्व पहा

इलेक्टोरल कॉलेजमध्ये ५३८ इलेक्टर्स आहेत. ते सर्व ५० राज्ये आणि कोलंबिया जिल्ह्याचं प्रतिनिधीत्व करतात. प्रत्येक राज्यात ३ ते ५४ इतके इलेक्टर्स आहेत. इलेक्टोरल मतदारांची संख्या त्यांच्या अमेरिकन सिनेटर आणि प्रतिनिधींच्या संख्येच्या आधारे ठरवली जाते. ५३८ जागांच्या निवडणुकीत जो २७० किंवा त्यापेक्षा जास्त जागा जिंकतो विजेता ठरतो. पण तोच राष्ट्रपती बनेल हे ठामपणे सांगता येत नाही. एखादा उमेदवार सर्वाधिक मते जिंकूनही इलेक्टोरल कॉलेजच्या मतदानात पराभूत होऊ शकतो. २०१६ मध्ये असं घडलं होतं. हिलरी क्लिंटन इलेक्टोरल कॉलेजमध्ये पराभूत झाल्या होत्या.

advertisement

मराठी बातम्या/विदेश/
US Election Result : 270 आकडा गाठला तरी खुर्ची मिळवणं कठीण, बहुमतानंतरही होऊ शकतो पराभव
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल