TRENDING:

US Election 2024: डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, शेअर मार्केट आणि भारतावर काय होणार परिणाम

Last Updated:

शेअर मार्केट आणि कंपन्यांची गुंतवणूक वाढणार आहे. याचा शेअर मार्केटवर मोठा परिणाम येत्या काळात दिसून येणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प निवडून आले आहेत. डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होत आहेत. ट्रम्प यांची विजयी घोडदौड सुरू असताना जागतिक बाजारपेठेत उत्साह होता. जागतिक मार्केटमध्ये तेजी होती. तर आशियातील शेअर्सही रॉकेटच्या स्पीडने धावत आहेत. सेन्सेक्स ३००-४०० अंकांनी वधारल्याचं पाहायला मिळालं. डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष होताच त्याचे लाँग टर्म परिणाम काय होणार हे समजून घेऊया.
Donald Trump
Donald Trump
advertisement

ET ने दिलेल्या अहवालानुसार या परिस्थितीचा भारताला मोठा फायदा होणार आहे. शेअर मार्केटवर याचे परिणाम चांगले दिसतील. शेअर मार्केट आणि कंपन्यांची गुंतवणूक वाढणार आहे. याचा शेअर मार्केटवर मोठा परिणाम येत्या काळात दिसून येणार आहे. ट्रम्प जिंकल्यास भारतीयांना निर्यात क्षेत्रांना फायदा होऊ शकतो. कारण चिनी उत्पादनांवरील उच्च शुल्कामुळे ऑटो पार्ट्स, सौर उपकरणे आणि यूएस बाजारातील रासायनिक उत्पादन यासारख्या क्षेत्रांमध्ये भारतीय उत्पादकांची स्पर्धा वाढू शकते.

advertisement

HPCL, BPCL, IOC सारख्या भारतीय तेल कंपन्या आणि IGL आणि MGL सारख्या गॅस वितरण कंपन्यांचे शेअर्स येत्या काळात तेजीत येऊ शकतात.

उत्पादन आणि संरक्षण क्षेत्रांमध्ये वाढ होऊ शकते कारण ट्रम्प यांनी यूएस औद्योगिक विकासावर भर दिल्याने ABB, Siemens, Cummins, Honeywell, GE T&D आणि Hitachi Energy या दोन्ही देशांमध्ये कार्यरत कंपन्यांना फायदा होऊ शकतो.

advertisement

ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय तणाव कमी होऊ शकतात. भारतीय व्यवसायांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. यूएस मॅन्युफॅक्चरिंग आणि लष्करी क्षमता मजबूत करण्यावर त्यांचे लक्ष भारत डायनॅमिक्स आणि एचएएल सारख्या भारतीय संरक्षण कंपन्यांना संधी देऊ शकते.भारतीय इक्विटी मार्केटला फायदा होऊ शकतो.

ट्रम्प राष्ट्रध्यक्षपदी आल्यानंतर काय होणार तोटे?

महागाई वाढण्याची शक्यता आहे. फेडचे व्याजदर वाढवले जातील. त्यामुळे सोन्याचे दर पुन्हा वाढतील. अमेरिकेतील उत्पादनं महागड्या किंमतीमध्ये बाहेरच्या देशात विकली जाण्याची शक्यता आहे. आर्थिक धोरणामुळे डॉलर पुन्हा मजबूत होऊन रुपया घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतात आयात खर्च वाढेल. तेलाच्या किंमती वाढतील.

advertisement

कालांतराने याच धोरणामुळे शेअर मार्केटमध्ये अस्थिरता येऊ शकते असा अर्थतज्ज्ञांचा अंदाज आहे. निफ्टीच्या 38% च्या तुलनेत Nasdaq 77% वाढला होता.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
वाहन ब्लॅकलिस्ट टाळायचंय? काय होतात त्याचे परिणाम? संपूर्ण माहितीचा Video
सर्व पहा

ट्रम्प यांच्या अंतर्गत H-1B व्हिसावरील पूर्वीच्या निर्बंधांमुळे भारतीय आयटी कंपन्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. स्थानिकांना नोकरी देण्यावर भर असल्याने अमेरिकेतील भारतीय नागरिकांनाही नोकऱ्यांसाठी धोका निर्माण होऊ शकतो. स्टार्टअपसाठी ट्रम्प यांची धोरणं आव्हानात्मक ठरू शकतात.

advertisement

मराठी बातम्या/विदेश/
US Election 2024: डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, शेअर मार्केट आणि भारतावर काय होणार परिणाम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल