डोनाल्ड ट्रम्प यांनी सुवर्णयुग सुरू कऱण्याची शपथ घेताना म्हटलं की, हे एक असं आंदोलन होतं जे याआधी कधीच कुणी पाहिलं नाही. खरं सांगायचं तर मला वाटतं की आतापर्यंतचं हे सर्वात मोठं राजकीय आंदोलन होतं. या देशात यापेक्षा मोठं कधी काही झालं नसावं.
आम्ही आपल्या देशाची मदत करणार आहे. आपल्याकडे एक असा देश आहे ज्याला खूप मदतीची गरज आहे. आपण असे अडथळे पार केले ज्याचा कुणीही विचार केला नव्हता. आता हे स्पष्ट आहे की आपण विजय मिळवला आहे असंही ट्रम्प म्हणाले्.
हा एक असा राजकीय विजय आहे जो आपल्या देशाने याआधी कधी पाहिला नाही, असा कोणताच विजय नाही. मी अमेरिकेच्या लोकांचा निवडून आलेला ४७ वा राष्ट्राध्यक्ष आणि ४५ वा राष्ट्राध्यक्ष बनवल्याबद्दल तुमचे आभार मानतो. मी तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी आणि तुमच्या भविष्यासाठी लढेन. प्रत्येक दिवशी मी तुमच्या प्रत्येक श्वासासाठी लढेन. जोपर्यंत भक्कम, सुरक्षित आणि समृद्ध अमेरिका होणार नाही तोपर्यंत स्वस्थ बसू शकणार नाही असंही ट्रम्प म्हणाले.
डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनणार आहेत. याआधी २०१६ च्या निवडणुकीत त्यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव केला होता. मात्र २०२० च्या निवडणुकीत ज्यो बायडेन यांच्याकडून त्यांना पराभवाचा धक्का बसला होता.
