डेमॉक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार आणि भारतीय वंशाच्या कमला हॅरिस राष्ट्रपतिपदाची निवडणूक हरल्या आहेत. त्या एक दमदार उमेदवार आहेत, असं अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मानलं जात होतं; मात्र मतमोजणी सुरू झाल्यानंतर इलेक्टोरल मतांच्या मोजणीत त्या खूप जास्त मागे पडल्या. न्यूयॉर्क टाइम्सचा अंदाज असं सांगतो, की इलेक्टोरल मतांची मोजणी पूर्ण झाल्यावर कमला हॅरिस यांना 232 मतं मिळतील, तर ट्रम्प यांना 306 मतं मिळतील.
advertisement
खूप लोकप्रिय मानल्या जाणाऱ्या कमला हॅरिस कोणत्या कारणांमुळे निवडणूक हरल्या? महिला वर्गाबरोबरच आशियाई वर्गाचा मोठा पाठिंबा त्यांना होता. तरीही त्या हरल्या, यामागची पाच कारणं जाणून घेऊ या.
आर्थिक चिंता : अनेक मतदार अर्थव्यवस्था हा प्राधान्याचा मुद्दा मानतात. ट्रम्प हे ऐतिहासिक रूपाने आर्थिक बाबतींमध्ये अधिक अनुकूल असल्याचं मानलं जातं. मतदारांचा एक मोठा वर्ग हॅरिस यांच्या तुलनेत ट्रम्प यांच्या आर्थिक धोरणांवर विश्वास ठेवणारा आहे. त्यामुळे स्वतंत्र विचाराच्या मतदारांची स्विंग व्होट्स ट्रम्प यांना मोठ्या प्रमाणावर मिळाली.
मतदारांनी विश्वास ठेवला नाही : ट्रम्प यांनी विशेषत्वाने श्वेतवर्णीय मतदारांमध्ये एक स्थिर अनुकूलता रेटिंग कायम राखलं आहे. तिथे त्यांची कामगिरी हॅरिस यांच्यापेक्षा सरस झाली. या लोकसंख्येचा पाठिंबा स्विंग राज्यांमध्ये महत्त्वाचा आहे. कारण त्या राज्यांच्या कौलावर निवडणुकीचे निकाल अवलंबून आहेत. मतदारांचा विश्वासघात आणि निवडणुकीत एक राहण्याबद्दल जेव्हा ट्रम्प बोलतात, तेव्हा एकत्र राहण्याची त्यांची घोषणा त्यांना एका मोठ्या वर्गाचा पाठिंबा मिळवून देते. निश्चितपणे या बाबतीत अमेरिकेची मोठी लोकसंख्या कमला हॅरिस यांच्यावर कदाचित कमी विश्वास ठेवते.
त्यांच्या भाषणांनी लोकांना निराश केलं : कमला हॅरिस यांची भाषणं अस्पष्ट किंवा अनिर्णायक मानली जातात. सार्वजनिक पातळीवर ठोस मतं व्यक्त न करण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीमुळे कदाचित मतदारांना हताश केलं असावं आणि त्यामुळेच कदाचित ते त्यांच्यापासून दूर झाले असावेत. उमेदवार म्हणून त्यांच्या योग्यतेबाबत लोकांच्या मनात शंका निर्माण झाली. याउलट ट्रम्प यांचं संवाद थेट त्यांच्या मतदारांना आकर्षित करणारा असे.
स्विंग स्टेट्सनी त्यांना हरवलं : स्विंग स्टेट्सचा विचार केला, तर ट्रम्प यांना प्रत्येक ठिकाणी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत जास्त मतं मिळाली आहेत. इलेक्टोरल व्होट्स मोठ्या संख्येने ट्रम्प यांना मिळाली आहेत. आवश्यक मतं मिळवण्याच्या दृष्टीने ही राज्यं महत्त्वाची आहेत. हॅरिस तिथे प्रभावी पाठिंबा मिळवू शकल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या पराजयाचं सर्वांत मोठं कारण हेही आहे.
डेमॉक्रॅटिक असंतोष : हॅरिस यांना उमेदवारी देण्याच्या निर्णयावर डेमॉक्रॅटिक पक्षाचे मतदार संतुष्ट नव्हते. डेमॉक्रॅटिक पक्षाने चार वर्षांत देशाला कणखर नेतृत्व दिलं नाही, म्हणूनही अनेक मतदार असंतुष्ट असल्याचं दिसलं. त्यामुळे ट्रम्प हे अधिक चांगला पर्याय ठरले आणि त्यांना पुन्हा निवडून दिलं गेलं. खासकरून मतदारांना असं वाटलं, की हॅरिस यांच्या धोरणांमध्ये ठोसपणाचा अभाव आहे. त्यामुळे डेमॉक्रॅटिक पक्षाकडे तूर्तास सक्षम नेतृत्व देण्याची क्षमता नाही. कदाचित त्यांना पक्षाचं पुरेसं पाठबळ मिळालं नाही.
