TRENDING:

भारताने केली लष्करी हालचाल, चीनची रात्री झोप उडाली; विचार ही केला नाही अशा ठिकाणी पाठवले सैनिक

Last Updated:

India Mongolia Military Exercise 2025: मंगोलियाच्या भूमीवर भारत आणि मंगोलियाच्या सैनिकांचा संयुक्त सराव झाला आहे. भारताने निःशब्दपणे केलेल्या हालचालीमुळे आशियातील सामरिक समीकरण बदलू शकते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
उलानबटार: मंगोलिया हा एक छोटा पण शांतताप्रिय देश असला तरी भारताच्या लष्करी आणि भौगोलिक रणनीतीमध्ये त्याचे महत्त्व झपाट्याने वाढत आहे. याच संदर्भात मंगोलियाच्या राजधानी उलानबटार येथील स्पेशल फोर्सेस ट्रेनिंग सेंटर मध्ये भारत आणि मंगोलिया यांच्यातील ‘नोमॅडिक एलिफंट 2025’ या संयुक्त लष्करी सरावाला सुरूवात झाली आहे. या सरावाकडे प्रथमदर्शनी एक सामान्य सैनिकी कवायत म्हणून पाहिले जाऊ शकते. मात्र त्यामागचा खरा उद्देश खूप मोठा आणि स्पष्ट आहे. चीनला रोखण्यासाठीचा भारताचा स्पष्ट आणि ठाम इशारा.
News18
News18
advertisement

चीनसाठी स्पष्ट संकेत

या सरावात भारताकडून 45 सैनिक सहभागी झाले असून त्यातील बहुतांश सैनिक अरुणाचल स्काउट्स युनिटचे आहेत. हीच ती युनिट आहे जी अरुणाचल प्रदेशात तैनात असते आणि हा तोच भाग जो चीन आपला मानतो. भारताने या निवडीद्वारे चीनला थेट आणि स्पष्ट संदेश दिला आहे की, ज्याला तुम्ही ‘तुमचा भाग’ म्हणता, तिथूनच आम्ही सैनिक पाठवत आहोत आणि आता त्यांना तुमच्या शेजारी प्रशिक्षण देत आहोत.

advertisement

चीनच्या दारात भारतीय लष्कराची उपस्थिती

मंगोलिया केवळ दोन देशांना लागून आहे, रशिया आणि चीन. भारताचा भौगोलिकदृष्ट्या येथे थेट संपर्क नाही. तरीही आता तिथल्या भूमीवर भारतीय लष्कर सराव करत आहे. ही बाब चीनसाठी गंभीर चिंता बनत आहे. कारण भारत आता केवळ स्वतःच्या सीमित चौकटीत राहणारा देश राहिलेला नाही. तर चीनच्या पारंपरिक प्रभाव क्षेत्रातही सक्रिय होऊ लागला आहे.

advertisement

रशियाच्या घरात 2000 KM आत घुसून हल्ला, युक्रेनने सायबेरियात थरकाप उडवला

‘सॉफ्ट पॉवर’द्वारे भारताची खोल रुजलेली उपस्थिती

भारत आणि मंगोलियाचे संबंध केवळ लष्करी मर्यादेत नाहीत. तर ते आध्यात्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्याही अतिशय मजबूत आहेत. मंगोलिया हा बौद्धधर्मीय बहुसंख्य लोकसंख्येचा देश आहे आणि भारताने गेल्या दशकभरात येथे सखोल सांस्कृतिक संबंध निर्माण केले आहेत. 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगोलिया भेटीदरम्यान बौद्ध ग्रंथ भेट देऊन अनेक मठांच्या जिर्णोद्धारासाठी मदत केली होती. जिथे चीन सैनिकी दबाव वापरतो तिथे भारताने ‘सॉफ्ट पॉवर’ चा प्रभाव वापरला आहे.

advertisement

सरावाचे स्वरूप

‘नोमॅडिक एलिफंट 2025’ मध्ये अतिरेकवादविरोधी मोहिमा, डोंगराळ भागांतील लष्करी नियोजन, संयुक्त राष्ट्र शांती मोहिमा, सायबर युद्ध, रूम इंटरव्हेन्शन, रिफ्लेक्स शूटिंग आणि चट्टानांवरील युद्ध कौशल्य आदी अत्याधुनिक सरावांचा समावेश आहे. यावरून स्पष्ट होते की भारत आणि मंगोलिया केवळ राजनैतिक मित्र नाहीत. तर लष्करी सहकार्याच्या माध्यमातून विश्वासाचे नाते मजबूत करत आहेत.

चीनसाठी डोकेदुखी

भारताने मंगोलियाला 1 अब्ज डॉलर्सची आर्थिक मदत दिली असून रेल्वे, ऊर्जा आणि यूरेनियम क्षेत्रातही सहकार्य वाढवले आहे. यामुळे चीनचा प्रभाव कमकुवत होत असून भारताचा आर्थिक आणि लष्करी प्रभाव वाढतो आहे. चीनसाठी हे तिहेरी धक्का आहे- सांस्कृतिक, सामरिक आणि आर्थिक.

चीनविरुद्ध ‘बहुआयामी’ घेराबंदी

-पश्चिमेकडून: पाकिस्तान व अफगाणिस्तान सीमारेषा

-पूर्वेकडून: इंडो-पॅसिफिक आणि क्वाड युती

-दक्षिणेकडून: अंडमान-निकोबार आणि चाबहार पोर्ट

-उत्तर दिशेने: आता मंगोलिया

भारत चीनला केवळ लष्करीदृष्ट्या नव्हे तर कूटनीतिक आणि सांस्कृतिक पातळीवरही घेरत आहे.

चीनसाठी धोक्याची घंटा

चीनने आजवर आपल्या शेजारच्या देशांना दबावाखाली ठेवले होते. पण आता मंगोलियासारखे देश भारताकडे पाहत आहेत.जिथे त्यांना स्थैर्य, सन्मान आणि समान भागीदारी दिसते. मंगोलियाचा भारताकडे वाढता कल चीनच्या आशिया धोरणासाठी धोक्याचा इशारा बनला आहे.

केवळ लष्करी नव्हे, तर...

‘नोमॅडिक एलिफंट’ हा सराव केवळ बंदुका आणि रणनितीपुरता मर्यादित नाही. तो दोन राष्ट्रांतील विश्वास आणि सहकार्याची पायाभरणी करत आहे. भारत चीनला हे स्पष्ट दाखवत आहे की तो केवळ सीमांचे रक्षण करणारा देश नाही. तर आता ‘जिओ-स्ट्रॅटेजिक’ खेळाडू म्हणून जागतिक व्यासपीठावर आपली भूमिका बजावत आहे.

मराठी बातम्या/विदेश/
भारताने केली लष्करी हालचाल, चीनची रात्री झोप उडाली; विचार ही केला नाही अशा ठिकाणी पाठवले सैनिक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल