2000 वर्ष जुनं संपूर्ण शहर समुद्राच्या खाली सापडलं आहे. हे पाहून गोताखोरांनाही आश्चर्य वाटलं. कारण समुद्राखाली सापडलेल्या या वस्तू एका आलिशान जागेशी जोडल्या गेल्या आहेत. हे खरोखर अंडरवर्ल्डसारखं आहे, ज्यामध्ये अनेक रहस्ये आहेत.
द सनच्या अहवालानुसार, समुद्राच्या खाली सापडलेल्या जगात 177 हेक्टरचे एक बुडालेलं शहर आहे, जे सुमारे 2000 वर्षे जुनं असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, वेळेनुसार त्याची स्थिती चांगली आहे. येथे समुद्राच्या पृष्ठभागावर अनेक मोठ्या मूर्ती आहेत. समुद्राच्या 20 फूट खाली पृष्ठभागावर एक सुंदर संगमरवरी मजला आहे, जो व्हिलाचे रिसेप्शन असल्याचं म्हटलं जात आहे. Park of the Phlegraean Fields नुसार, हे शहर तिसऱ्या शतकातील असल्याचे मानले जाते, ज्याचे नाव बाईया असे असल्याचं सांगितलं जातं.
advertisement
अजबच! 19 महिन्यांत फक्त एका वर्षाने वाढतं 'या' व्यक्तीचं वय, काय आहे नेमकं प्रकरण?
असं मानलं जातं, की श्रीमंत लोक खाजगी सहलीसाठी येथे येत असावेत. हे एक फॅशनेबल सीसाइड रिसॉर्ट असावं. ज्याभोवती फक्त रोमचे सर्वात श्रीमंत लोक फिरायला येत असतील. ज्युलियस सीझर, क्लियोपात्रा, सिसेरा आणि हॅड्रियन सारख्या प्रसिद्ध लोकांनीही या प्राचीन शहराला भेट दिली असावी. जॉन स्माउट नावाच्या संशोधकाचा दावा आहे की क्लियोपाट्रानेही या ठिकाणी भेट दिली असावी. कालांतराने, हायड्रोथर्मल आणि भूकंपीय क्रियाकलापांमुळे हे आलिशान शहर बुडालं.
