अजबच! 19 महिन्यांत फक्त एका वर्षाने वाढतं 'या' व्यक्तीचं वय, काय आहे नेमकं प्रकरण?
- Published by:Minal Gurav
- trending desk
Last Updated:
या व्यक्तीने आपलं वय वाढण्याचा वेग इतका कमी केला आहे की तो दर 19 महिन्यांनी आपला वाढदिवस साजरा करू शकतो. हा नेमका काय प्रकार आहे? पाहूयात.
मुंबई : सध्याच्या काळात आपल्या वयाच्या तुलनेत जास्त तरुण दिसण्याची क्रेझ आहे. अतिशय आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तरुण राहण्याचा प्रयत्न केल्याच्या बातम्याही तुम्ही ऐकल्या किंवा वाचल्या असतील. आताही अशीच एक बातमी प्रसिद्ध झाली आहे. 46 वर्षांचा सॉफ्टवेअर अब्जाधीश ब्रायन जॉन्सन गेल्या कित्येक वर्षांपासून आपलं जैविक वय कमी करण्याच्या प्रयत्नात होता. त्याने आता असा दावा केला आहे, की त्याने आपलं वय वाढण्याचा वेग इतका कमी केला आहे की तो दर 19 महिन्यांनी आपला वाढदिवस साजरा करू शकतो. आपल्या वय कमी करण्याच्या ध्यासासाठी 2013मध्ये ब्रायनने आपली Braintree Venmo ही कंपनी पेपालला 800 मिलियन डॉलर्सना विकली होती. तेव्हापासून तो आपल्या शरीरावर वर्षाला अंदाजे दोन मिलियन डॉलर्स खर्च करत आहे.
मानवाचं आयुष्य जास्तीत जास्त सुमारे 120 वर्षं आहे हे मान्य करून, आपलं वय पुन्हा 18वर नेण्याचं त्याचं ध्येय आहे. जॉन्सनने इतिहासात सर्वांत जलद अँटी-एजिंगच्या विक्रमासह यशस्वी झाल्याचा दावा केला आहे. त्याने आपलं 'एपिजेनेटिक' वय केवळ सात महिन्यांत 5.1 वर्षांनी कमी केलं आहे. जॉन्सनने वापरलेल्या पद्धतींबद्दल अनेक तज्ज्ञ साशंक आहेत.
advertisement
तो म्हणतो, की त्याने वय वाढण्याची प्रक्रिया थांबवण्यासाठी होलिस्टिक, होल-बॉडी दृष्टिकोन स्वीकारला आहे. तो 1977 कॅलरीज असलेला वेगन आहार, तसंच विविध सप्लिमेंट्स आणि औषधं घेत आहे. त्याने एमआरआय, अल्ट्रासाउंड आणि कोलोनोस्कोपीसारख्या प्रक्रियादेखील केल्या आहेत. या क्षेत्रात काय साध्य केलं जाऊ शकतं हे इतरांना कळण्यासाठी तो सार्वजनिकपणे आपली आकडेवारी ऑनलाइन शेअर करत आहे.
advertisement
18 जून रोजी इन्स्टाग्रामवर त्याने लिहिलं होतं, की सप्टेंबर 2023मध्ये फॉलिस्टाटिन जीन थेरपी म्हणून ओळखला जाणारा प्रयोग त्याने केला होता. या प्रयोगातून उंदरांचं आयुष्य 30 टक्क्यांनी वाढल्याचा दावा जॉन्सनने केला. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास, या थेरपीमध्ये शरीरातलं फॉलिस्टाटिनचं उत्पादन वाढवलं जातं. फॉलिस्टाटिन हे एक प्रोटीन असून, ते स्नायूंच्या वाढीसाठी आणि प्रजननक्षमतेशी संबंधित आहे.
advertisement
जॉन्सनचा दावा आहे, की त्याच्यावर झालेल्या उपचारांमुळे वय वाढण्याचा दर 0.64 पर्यंत कमी झाला आहे. याचा अर्थ दर 19 महिन्यांनी त्याचं वय एका वर्षाने वाढत आहे. तो म्हणाला, "माझ्या स्नायूंच्या वस्तुमानात सात टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि फॉलिस्टाटिनची पातळी 160 टक्क्यांनी वाढली आहे.
त्याने वय कमी करण्यासाठी आधुनिक उपचार पद्धतीचा वापर केला असला तरी त्याच्या मते निरोगी जीवन जगण्यासाठी पारंपरिक मार्ग महत्त्वपूर्ण आहेत. झोप, आहार आणि व्यायाम हे तीन मूलभूत घटक आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 29, 2024 6:03 PM IST
मराठी बातम्या/Viral/
अजबच! 19 महिन्यांत फक्त एका वर्षाने वाढतं 'या' व्यक्तीचं वय, काय आहे नेमकं प्रकरण?


