लग्नात 3 पेक्षा जास्त दागिने घालाल तर 50,000 रुपयांचा दंड, कुठे आणि का काढलाय असा अजब नियम
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
उत्तराखंडच्या कंदाड आणि इद्रोली गावांनी लग्नात महिलांना फक्त तीन सोन्याचे दागिने परिधान करण्याचा नियम केला, उल्लंघन केल्यास ५०,००० दंड लागू होईल.
लग्न म्हटलं की प्रत्येक महिलेसाठी एक सोहळा असतो, या सोहळ्यामध्ये प्रत्येक मुलीला नटण्या मुरड्याची सगळी हौस पूर्ण करुन घ्यायची असते. साज शृंगार करायचा असतो. आपल्याकडे लग्न समारंभात सोन्याला विशेष महत्त्व आहे. विवाहसोहळे, विशेष सण, मुंडन संस्कार आणि इतर मंगल कार्यात महिला आवर्जून सोन्याचे दागिने परिधान करतात. लग्नात फक्त तीनच दागिने परिधान करायचे असा अजब फतवाच एका गावानं काढला आहे, या अजब फतव्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. हे गाव नेमकं कुठे आहे आणि असा अजब फतवा का काढला आहे?
फक्त ३ सोन्याचे दागिने घालण्याची परवानगी
उत्तराखंडमधील जौनसार-बावर क्षेत्रातील कंदाड आणि इद्रोली या दोन गावांनी विवाह समारंभात महिलांनी घालण्याच्या दागिन्यांवर कडक नियम लागू केले आहेत. ग्रामपंचायत कंदाड येथे झालेल्या सामाजिक बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार, कंदाड आणि इद्रोली गावातील महिलांना आता लग्न समारंभ आणि मंगल कार्यांमध्ये सोन्याचे केवळ तीनच दागिने परिधान करण्याची परवानगी दिली
advertisement
नियम मोडल्यास ५०,००० चा मोठा दंड
पंचायतने स्पष्ट सांगितलं की, जर एखाद्या व्यक्तीने या नियमांचे उल्लंघन केले आणि तीनपेक्षा जास्त सोन्याचे दागिने परिधान केले, तर तिच्यावर ५०,००० रुपयांचा मोठा दंड आकारला जाईल. समाजातील शिस्त आणि समानता टिकवण्यासाठी हा नियम अत्यंत कठोरपणे लागू करण्यात आला आहे.
दिखावा कमी करणे हा मुख्य उद्देश
पंचायतने हा निर्णय समाजात वाढणारा दागिन्यांचा दिखावा आणि त्यामुळे वाढणारी आर्थिक विषमता कमी करण्यासाठी घेतला आहे. पंचायतच्या या नवीन नियमानुसार, महिलांना लग्न समारंभात केवळ आवश्यक दागिने जसे की कानातले, नथ आणि मंगळसूत्र हेच परिधान करण्याची परवानगी असेल. याव्यतिरिक्त इतर जास्त सोन्याच्या दागिन्यांचे प्रदर्शन करण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
advertisement
गरीब कुटुंबांवरील ताण कमी
view commentsस्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, अनेकदा लग्न समारंभात सामाजिक दबावामुळे कुटुंबे आपल्या क्षमतेपेक्षा जास्त खर्च करतात, ज्यामुळे गरीब कुटुंबांवर अतिरिक्त आर्थिक भार पडतो. दागिन्यांच्या दिखाव्यामुळे सामाजिक स्पर्धा वाढत होती. सोनं खूप महाग झालं आहे. आमच्याकडे इतके पैसे नाहीत की आम्ही आमच्या मुला-मुलींच्या लग्नात सोने खरेदी करू शकू. हा निर्णय खूप चांगला आहे, कारण आता गरीब कुटुंबांवरील खर्च करण्याचा दबाव कमी होईल आणि समाजात साधेपणाचा संदेश जाईल." या निर्णयामुळे समाजात समानता आणि साधेपणाची भावना वाढेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
Location :
Uttarakhand (Uttaranchal)
First Published :
October 30, 2025 8:58 AM IST
मराठी बातम्या/देश/
लग्नात 3 पेक्षा जास्त दागिने घालाल तर 50,000 रुपयांचा दंड, कुठे आणि का काढलाय असा अजब नियम


