उपासना असं या तरुणीचं नाव आहे. वयाच्या 22 व्या वर्षीच उपासनाला 60000 रुपये पगार असलेली नोकरी. पण तिने ही नोकरी सोडण्यासारखा मोठा निर्णय घेतला. तिने आपल्या हेल्थसाठी नोकरी सोडली आहे. तिने आपली संपूर्ण कहाणी सोशल मीडियावर सांगितली आहे. उपासनाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. 'आयुष्याचं काही सांगू शकत नाही', असं कॅप्शन तिने व्हिडीओला दिलं आहे.
advertisement
बंदुकीच्या धाकावर लुटलं, तरी लोक करत आहेत या चोरांचं कौतुक, का? Watch Video
व्हिडीओमध्ये उपासनाने सांगितलं की, "मी महिन्याला 60000 रुपये कमवत होती. पण मी ती नोकरी सोडली. काम सोपं होतं पण तिथं नाइट शिफ्ट होती. दर तीन दिवसांनी मला डोकेदुखी, अॅसिडीटी व्हायची. माझा बीपी लो व्हायचा आणि मला भीती वाटायची. वयाच्या 22 व्या वर्षापर्यंत मी आर्थिकरित्या सुरक्षित झाले होते. पण मला आरोग्य हवं की पैसा याचा विचार करावा लागला"
"लोक म्हणतात की पैसा तर येतो जातो पण तुमचं शरीर खराब झालं तर ना पैसा कामी येणार ना तुम्ही. त्यामुळे मी माझं आरोग्य निवडलं. मी पुन्हा नव्याने सुरुवात करेन. पुढे काय आहे मला माहिती नाही. पण माझं परतणं कसं असेल पाहुयात", असं ती म्हणाली.
यह ढाई किलो का हाथ! खरंच माणसाच्या हाताचं वजन अडीच किलो असू शकतं का?
आरोग्यासाठी हजारो रुपये पगाराची नोकरी सोडणाऱ्या उपासनाच्या हिमतीला बहुतेकांनी दाद दिली आहे, तिचं कौतुक केलं आहे. तुम्हाला उपासनाचा निर्णय कसा वाटला? आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.