महिला महाकाय अजगरांना अंगावर घेत त्यांच्याशी मस्ती करत आहे. त्यांच्यामध्ये बसून ती एकदम आरामात आहे. तिला ते चावतील किंवा काही घडेल याची चिंताही तिच्या चेहऱ्यावर दिसत नाही. या महिलेचा व्हिडीओही समोर आला असून तो इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होतोय.
Viral News: महिलेनं विमानात केलं विचित्र कृत्य, पाहून लोक काढायला लागले PHOTO
advertisement
ही महिला आहे जुलिएट ब्रूअर. ती एक झूकीपर आहे. तिचं इन्स्टाग्राम अकाऊंट पाहिलं तर साप, चित्ता, अजगर, मगर अशा वेगवेगळ्या प्राण्यांनी भरलं आहे. जे लोक घाबरट आहे त्यांना तर हे पाहून धडकीच भरु शकते. अनेक दृश्य अंगावर काटा आणणारी आहेत.
सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. जुलिएट 27 महाकाय अजरांच्या मध्ये बसलीय. अजगर तिच्या मानेवरुन, डोक्यावरुन फिरत आहेत. ती मस्त हसत बोलत आहे. हे दृश्य चकित करणारं आहे. महिलेचा व्हिडीओ व्हायरल होताच अनेक कमेंट पहायला मिळाल्या. अनेकांनी चिंता व्यक्त केली. काही जण म्हणाले शेवटी ते प्राणीच आहे कधी हल्ला करतील सांगू शकत नाही.
जुलिएट सोशल मीडियावर खूप फेमस आहे. The Reptile Zoo या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ती असे अनेक प्राण्यांचे व्हिडीओ शेअर करत असते. तिचे प्राण्यांचे व्हिडीओ भरपूर पाहिले जातात.