घरातील टॉयलेटमध्ये अचानक सापांची सेना आढळली. हे पाहून घरातल्यांची अवस्था टाईट झाली. आसाममधील नागौन जिल्ह्यातील ही घटना असल्याचं म्हटलं जातंय. या व्हिडीओनं इंटरनेटवर खळबळ उडवली आहे.
Water Park मध्ये तरंगत होती घृणास्पद गोष्ट, पाहताच पाण्याबाहेर धावले सगळे, असं काय होतं? पाहा Video
समोर आलेला व्हिडीओ एनआयनं आपल्या x अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, टॉयलेटला जाण्यासाठी घरातील सदस्यानं टॉयलेटचा दरवाजा उघडला तेव्हा त्याला हे असं भयानक दृश्य दिसलं. संपूर्ण सांपाची सेना टॉयलेटमध्ये होती. हे पाहून कोणाच्याही अंगावर काटा उभा राहिल. सापांना पाहताच कुटुंबाने सर्पप्रेमीला बोलावून त्यांना काढायला सांगितलं. एकूण 35 साप टॉयलेटमधून बाहेर काढले.
advertisement
दरम्यान, नुकत्याच बनवलेल्या एका नव्या बाथरुममध्ये हे साप आढळले. त्यामुळे कुठेही आणि कशाही जागेतून साप येऊ शकतात. त्यामुळे सतत सावधानी आणि सतर्कता बाळगणं गरजेचं आहे.