Water Park मध्ये तरंगत होती घृणास्पद गोष्ट, पाहताच पाण्याबाहेर धावले सगळे, असं काय होतं? पाहा Video

Last Updated:

वॉटरपार्क संबंधीत एक व्हिडीओ आणि माहिती समोर आली आहे, ज्याबद्दल ऐकल्यानंतर आता तुम्ही वॉटरपार्कमध्ये जाण्याचं वेड सोडून द्याल.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : या वर्षीच्या उकाड्याने माणसांना वेडं करुन सोडलंय. इतकी जास्त उष्णता वाढली आहे की लोक घराबाहेर देखील पडणं टाळतात. घरचा पंखा देखील मन शांत करत नाही म्हणून लोकांवर एसी घेण्याची वेळ आली आहे. उन्हाळ्यात फक्त पाण्याखाली किंवा पाण्यात बसावं असं सगळ्यांना वाटतं, ज्यामुळे बहुतांश लोक हे वॉटरपार्कमध्ये जातात.
उन्हाळ्याच्या काळात वॉटर पार्ककडे नागरिकांची गर्दी उसळते. अशावेळी लोक पाण्यात खूप मजा करतात. याशिवाय वॉटर पार्कमध्ये अनेक राइड्सही आहेत. ज्यामुळे तिथे जाणं एडवेंजरस देखील होतं. यावर्षी तर अती उष्णतेमुळे लोकांनी वॉटरपार्कमध्ये आणखीच गर्दी केली आहे.
पण वॉटरपार्क संबंधीत एक व्हिडीओ आणि माहिती समोर आली आहे, ज्याबद्दल ऐकल्यानंतर आता तुम्ही वॉटरपार्कमध्ये जाण्याचं वेड सोडून द्याल.
advertisement
हा व्हिडीओ बिलासपूरमधील एका वॉटर पार्कचा आहे. या व्हिडीओमध्ये पार्कच्या स्विमिंग पूलच्या पाण्यात अशी गोष्ट तरंगताना दिसली, जी पाहिल्यानंतर तुम्ही तुमचा वॉटर पार्कचा प्लॅन रद्द कराल. लोक हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.
हा व्हिडीओ बिलासपूरच्या बबल आयलंडचा असल्याचे बोललं जात आहे. व्हिडीओमध्ये अनेक लोक पार्कच्या पूलमध्ये मजा करताना दिसत आहेत. पण दरम्यान कॅमेरा पाण्यात काहीतरी तरंगत असणाऱ्या गोष्टीवर फोकस झाला.
advertisement
View this post on Instagram

A post shared by sunset (@sun_set_11_)

advertisement
खरंतर स्वीमिंग पुलच्या पाण्यात पॉटी तरंगत असल्याचे दिसून येते. कोणी तरी पाण्यात पॉटी किंवा संडास केलं होतं. हे पाहून लोकांना मळमळल्यासारखे वाटले. सर्वात घृणास्पद गोष्ट म्हणजे त्या वेळी लोक या पाण्यात भिजताना आणि त्याच बुडण्याता आनंद घेताना दिसत आहेत.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होताच व्हायरल झाला. यावर लोकांनी जोरदार कमेंट करायला सुरुवात केली. या व्हिडीओमध्ये अनेकांनी आपल्या मित्रांना टॅग करून वॉटर पार्कचे वास्तव दाखवले. याच कारणामुळे त्यांना वॉटर पार्कमध्ये जायला आवडत नाही, असे अनेकांनी लिहिले आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Water Park मध्ये तरंगत होती घृणास्पद गोष्ट, पाहताच पाण्याबाहेर धावले सगळे, असं काय होतं? पाहा Video
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement