मानवी शरीर जळायला किती वेळ लागतो?
तज्ज्ञांच्या मते, तापमान 670 ते 810 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान असेल तर शरीर अवघ्या 10 मिनिटांत वितळू लागतं आणि 20 मिनिटांनंतर कपाळावरचं हाड मऊ टिश्यूपासून मुक्त होतं. टॅब्युला एक्सटर्नामध्ये म्हणजे कपाळाच्या पोकळ भिंतीमध्ये क्रॅक दिसू लागतात. याशिवाय अर्ध्या तासात संपूर्ण त्वचा जळून जाते. अंत्यसंस्कार सुरू झाल्यानंतर 40 मिनिटांनंतर अंतर्गत अवयव आकुंचन पावतात. त्यानंतर शरीर जाळीसारखं किंवा स्पंजसारखं दिसतं. 50 मिनिटांनंतर हात आणि पाय काही प्रमाणात नष्ट होतात आणि फक्त धड उरतं. ते एक-दीड तासांनंतर तुटतं आणि वेगळं होतं. मानवी शरीर पूर्णपणे जळण्यासाठी सुमारे दोन-तीन तास लागतात. असं असूनही शरीराचा एक भाग इतक्या वेळानंतरही जळत नाही.
advertisement
VIDEO: महिलेला कारचा दरवाजा उघडताच दिसलं असं काही....लगेच घरात ठोकली धूम
कोणता अवयव नाही जळत
मृत्यूनंतर जेव्हा पार्थिवाला अग्नी दिला जातो, तेव्हा शरीराचे सर्व अवयव जळतात, फक्त दात राहतात. शरीर जळल्यानंतर फक्त दातच असतात. ते तुम्ही ओळखू शकता. याशिवाय शरीराचे उर्वरित सर्व अवयव जळून राख होतात. शास्त्रज्ञांच्या मते दात न जळण्यामागे विज्ञान आहे.
दात कॅल्शियम फॉस्फेटचे बनलेले असतात आणि त्यामुळे त्यांना आग लागत नाही. अंत्यसंस्काराच्या वेळी, दाताच्या सर्वांत मऊ ऊती आगीत जळतात, तर सर्वांत कठीण ऊती जळत नाहीत. काही हाडंदेखील कमी तापमानातदेखील जळू शकत नाहीत. शास्त्रज्ञांच्या मते, शरीरातली सर्व हाडं जाळण्यासाठी 1292 डिग्री फॅरनहाइटचं अत्यंत उच्च तापमान आवश्यक असतं; पण या तापमानातही कॅल्शियम फॉस्फेट पूर्णपणे जळून राख होणार नाहीत. दात कॅल्शियम फॉस्फेटचे बनलेले असल्याने आगीतही जळत नाहीत.