VIDEO: महिलेला कारचा दरवाजा उघडताच दिसलं असं काही....लगेच घरात ठोकली धूम

Last Updated:

मानवी वस्त्यांकडे जंगली प्राण्यांचा वावर वाढलेला पहायला मिळतोय. जंगलाच्या आजूबाजूला असलेल्या वस्त्यांमध्ये, गावांमध्ये तर ते हमखास भटकताना दिसतात. अनेकदा हे प्राणी सामानाचं नुकसान करतात किंवा माणसांवर, पाळीव प्राण्यांवर हल्ला करतात.

महिलेला कारचा दरवाजा उघडताच दिसलं असं काही....
महिलेला कारचा दरवाजा उघडताच दिसलं असं काही....
नवी दिल्ली : मानवी वस्त्यांकडे जंगली प्राण्यांचा वावर वाढलेला पहायला मिळतोय. जंगलाच्या आजूबाजूला असलेल्या वस्त्यांमध्ये, गावांमध्ये तर ते हमखास भटकताना दिसतात. अनेकदा हे प्राणी सामानाचं नुकसान करतात किंवा माणसांवर, पाळीव प्राण्यांवर हल्ला करतात. त्यामुळे लोकांच्या मनात दहशत निर्माण झालीय. समोर आलेल्या घटनेमध्ये तर महिलेच्या गाडीतच प्राणी जाऊन बसल्याचं पहायला मिळालं.
एक महिला गाडीचा दरवाजा ओपन ठेवून घरातून सामान आणण्यासाठी गेली. ती ते सामान गाडीत ठेवायला आली तेव्हा गाडीत एक प्राणी जाऊन बसला होता. त्याला पाहून महिला घाबरली आणि तेथून पळून गेली. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.
advertisement
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, जंगलाच्यामध्ये बनलेलं घर आहे. घरापुढे गाडी पार्क केलेली दिसतेय. महिला घरात काहीतरी सामान आणण्यासाठी गेली आणि परत येताच तिला गाडीत अस्वल शिरल्याचं दिसलं. हे पाहून ती घाबरली आणि तिनं गाडीचा दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र अस्वल आतून दरवाजा जोराने ढकलंत होता. मग अस्वल बाहेर यायला लागताच महिलेनं हातातील सामान फेकून देऊन घरात धाव घेतली. अस्वलही बाहेर येताच इकडे तिकडे फिरायला लागलं.
advertisement
@gaju_gade नावाच्या X अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 41 सेकंदांचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही काही वेळासाठी घाबराल. घराच्या बाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही सर्व घटना कैद झाली. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर व्हिडीओवर अनेक कमेंट येत आहेत.
view comments
मराठी बातम्या/Viral/
VIDEO: महिलेला कारचा दरवाजा उघडताच दिसलं असं काही....लगेच घरात ठोकली धूम
Next Article
advertisement
Eknath Shinde Sharad Pawar : शरद पवारांना वाढदिवसानिमित्ताने एकनाथ शिंदेंच्या खास शुभेच्छा, ''तुम्ही...'', पाहा Video
शरद पवारांना वाढदिवसानिमित्ताने एकनाथ शिंदेंच्या खास शुभेच्छा, ''तुम्ही...'',
  • शरद पवारांना वाढदिवसानिमित्ताने एकनाथ शिंदेंच्या खास शुभेच्छा, ''तुम्ही...'', Vi

  • शरद पवारांना वाढदिवसानिमित्ताने एकनाथ शिंदेंच्या खास शुभेच्छा, ''तुम्ही...'', Vi

  • शरद पवारांना वाढदिवसानिमित्ताने एकनाथ शिंदेंच्या खास शुभेच्छा, ''तुम्ही...'', Vi

View All
advertisement