उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील एक नवविवाहित जोडपं, कौशल्येंद्र प्रताप सिंह आणि अंकिता सिंह अशी त्यांची नावं. 5 मे रोजी त्यांचं लग्न झालं. 24 मे रोजी हे दोघं हनीमूनसाठी सिक्कीमला गेले. 15 दिवस उलटूनही ते घरी परतलेले नाहीत.
29 मे रोजी संध्याकाळी भूस्खलनग्रस्त मंगन जिल्ह्यात ज्या कारमध्ये दोघं प्रवास करत होते, ती तीस्ता नदीत 1 हजार फूट खोलवर कोसळली. लाचेन-लाचुंग महामार्गावरील मुनसिथांगजवळ कार रस्त्यावरून घसरली. त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या नऊ जणांपैकी एकाचा मृत्यू झाला आणि दोन जखमी झाले. आठ प्रवासी अजूनही बेपत्ता आहेत. या बेपत्तांमध्ये अंकिता आणि कौशल्येंद्र हे कपल आहे.
advertisement
जागरणच्या वृत्तानुसार कौशल्येंद्रच्या वडिलांनी सांगितलं की, "माझा मुलगा आणि सून यांची गाडी सिक्कीममध्ये नदीत कोसळल्यानंतर ते बेपत्ता आहेत. आम्ही घटनास्थळी अनेक वेळा भेट दिली आहे. घटनास्थळावरून ज्या काही वस्तू सापडल्या आहेत, त्यात माझ्या मुलाच्या आणि त्याच्या पत्नीच्या कोणत्याच वस्तू नाहीत. मी ते दोघं सापडल्याशिवाय घरी परतणार नाही."
पुढे ते म्हणाले, "मी सर्वांना विनंती करतो की माझ्या मुलाच्या आणि सुनेच्या आयुष्यासाठी प्रार्थना करा." मी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या सिक्कीमच्या समकक्षांना शोध आणि बचाव कार्य जलद करण्याची विनंती करावी,"
पंडितने काढला होता शुभमुहूर्त, पण त्याआधीच हनीमूनला गेलं कपल, घडलं भयंकर
बेपत्ता झालेल्या आठ पर्यटकांचा शोध एनडीआरएफ, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा, वन विभाग, पर्यटन विभाग, टीएएएस (सिक्कीम ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशन) आणि पोलिसांकडून घेतला जात आहे. खराब हवामानामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत.