TRENDING:

Ajab Gajab: टॉयलेट सीटमध्ये सर्व्ह करतात चॉकलेट, पाहूनच येईल किळस!

Last Updated:

स्ट्रीट फूड आणि रेस्टॉरंटमध्ये विक्रेते ग्राहकांचं लक्ष वेधण्यासाठी अनेक हटके गोष्टी करतात. खाद्यपदार्थ आणि ते सर्व्ह करण्याची टेक्निक लोकांना आकर्षित करण्यासाठी वापरतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : स्ट्रीट फूड आणि रेस्टॉरंटमध्ये विक्रेते ग्राहकांचं लक्ष वेधण्यासाठी अनेक हटके गोष्टी करतात. खाद्यपदार्थ आणि ते सर्व्ह करण्याची टेक्निक लोकांना आकर्षित करण्यासाठी वापरतात. जेणेकरुन जास्तीत जास्त लोक त्यांच्याकडे येतील. काहींची विचित्र स्टाईलही चर्चेचा विषय ठरते. अशाच एका रेस्टॉरंटची चॉकलेट सर्व्ह करण्याची पद्धत पाहून किळस येईल.
टॉयलेट सीटमध्ये सर्व्ह केली चॉकलेट
टॉयलेट सीटमध्ये सर्व्ह केली चॉकलेट
advertisement

तुम्ही आजपर्यंत अनेक रेस्टॉरंटमध्ये गेला असाल किंवा काही रेस्टॉरंटविषयी ऐकलं असेल. मात्र असं एक रेस्टॉरंट आहे जिथे चॉकलेट चक्क टॉयलेट सीटमध्ये सर्व्ह केली जाते. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खळबळ उडवत आहे.

लग्न करण्याचा एवढा आनंद, वर भररस्त्यात लागला लोळू, VIDEO पाहून पोट धरुन हसाल!

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, काही मुलींनी एका रेस्टॉरंटमध्ये चॉकलेट ऑर्डर केली. थक्क करणारी गोष्ट म्हणजे त्यांनी ती ज्या प्रकारे सर्व्ह केली. रेस्टॉरंटने चॉकलेट आईस्क्रीम टॉयलेट सीटमध्ये दिली. तुम्ही पाहू शकता एकदम खऱ्याखुऱ्या टॉयलेट सीटमध्ये आईस्क्रीम दिली गेली. ती ज्या प्रकारे दिसतीय ती पाहून कोणालाही उलटी येईल. रेस्टॉरंटची ही किळसवाणी पद्धत इंटरनेटवर वाऱ्यासारखी व्हायरल झालीय.

advertisement

millions2billions नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ व्हायरल होताच लोकांनी अनेक मजेशीर कमेंट केल्या आहेत. तर काहींनी म्हटलं टॉयलेट सीटमध्ये आईस्क्रीम खायची म्हटल्यावर ती सोडूनच द्यावी लागेल. काहींनी किळस येत असल्याचं सांगितलं. अशा निरनिराळ्या कमेंट व्हिडीओवर येत आहेत.

advertisement

दरम्यान, अशा वेगवेगळ्या रेस्टॉरंटमध्ये त्यांची वेगवेगळ्या विशेष गोष्टी असतात ज्यांच्यासाठी ते ओळखलं जातं. मात्र अनेकदा लोकांना चकित करणाऱ्या गोष्टी रेस्टॉरंटमध्ये सर्व्ह केल्या जातात. याचे व्हिडीओही व्हायरल होतात.

मराठी बातम्या/Viral/
Ajab Gajab: टॉयलेट सीटमध्ये सर्व्ह करतात चॉकलेट, पाहूनच येईल किळस!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल