बंगळुरूच्या व्यस्त तुमाकुरु राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीस्वारांनी स्टंटबाजी केल्यामुळे काही रागावलेल्या लोकांनी त्यांच्या दुचाकी उड्डाणपुलावरून फेकल्या. घटनेची नेमकी तारीख स्पष्ट झालेली नाही, परंतु काहींच्या मते ती 15 ऑगस्ट रोजी ही घडली होती.
सोशल मीडिया हँडल X वर अपलोड केल्यापासून या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये फ्लायओव्हरवर मोठ्या संख्येने जमलेले लोक स्टंट करणाऱ्या बाइकस्वारांना ओरडताना आणि त्यांच्या बाईक फेकताना दिसत आहेत. त्यानंतर संतप्त जमावातील एका सदस्याने स्कूटरसह दोन दुचाकी उड्डाणपुलावरून फेकल्या.
advertisement
पुलाच्या खाली उभ्या असलेल्या एका व्यक्तीने हे दृश्य चित्रित केले आणि जमावाने दुचाकीस्वारांना केलेली शाब्दिक शिवीगाळ आणि लोकांच्या संतापाचे समर्थन केले.
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, बेंगळुरू पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आणि घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक गुन्हे दाखल केले.
सार्वजनिक सुरक्षा धोक्यात आणल्याबद्दल पोलिसांनी 36 जणांवर 34 गुन्हे दाखल केले आहेत, ज्यात स्कूटर फेकून देणारे आणि स्टंट करणारे लोक यांचा समावेश आहे.
या व्हायरल व्हिडीओला नेटिझन्सकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. एका यूजरने लिहिले की, "लोकांमध्ये असा बदल झाला तर रस्त्यावर कोणीही स्टंट करणार नाही." तर काहींनी त्या नागरिकांचं वागणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. प्रत्येकाचा या व्हिडीओकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे.