Shocking Accident : तरुणावर तिसऱ्या मजल्यावरुन पडला AC, जागेवरच मृत्यूने गाठलं; हृदयद्रावक Video समोर

Last Updated:

या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. या घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, एक युवकही जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

धक्कादायक व्हिडीओ
धक्कादायक व्हिडीओ
मुंबई : एखाद्याला चालता चालता अचानक मृत्यूने गाठलं, या संबंधी अनेक घटना तुम्ही ऐकल्या असणार, पण यासंबंधीत घटना कॅमेरात कैद झाली आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीचा रस्त्यात चालत असताना मृत्यू झाला आहे. या व्यक्तीला अचानक मृत्यूने गाठलं, ही घटना हृदयद्रावक आहे.
या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. या घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, एक युवकही जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
हे प्रकरण दिल्लीतील करोल बाग भागातील आहे. येथील डीबीजी रोडवरील डोरीवलन परिसरात हा तरुण रात्री मित्रासोबत बोलत होता. यावेळी तो दुचाकीवर बसला होता. बोलत असताना अचानक दुचाकीवर बसलेल्या तरुणाच्या डोक्यात मोठी गोष्ट पडली. या घटनेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
शेजारी उभ्या असलेला तरुण ही घाबरला, नक्की काय पडलं असं त्याला जाणवलं, नंतर पाहिले असता तो एसी असल्याचे त्याच्या लक्षात आले, जो तिसऱ्या मजल्यावरून थेट तरुणाच्या डोक्यावर पडला आणि त्याच्या मृत्यूचे कारण बनला.
या वेदनादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांचे म्हणणे समोर आले आहे. शनिवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाली. एका व्यक्तीवर एसी पडल्याचे सांगण्यात आले. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता, करोलबाग येथील डीजीबी रोड परिसरात दुसऱ्या मजल्यावरून बाहेरचा एसी तरुणावर पडल्याचे दिसून आले.
advertisement
advertisement
अपघातानंतर तरुणाला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. या अपघातात जितेश नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला, तर दुसरा तरुण प्रांशूवर उपचार सुरू आहेत. दोन्ही तरुणांची ओळख पटली आहे. 18 वर्षीय जितेश हा दोरीवालनचा रहिवासी होता, तर अपघातात जखमी झालेला 17 वर्षीय तरुण प्रांशु हा पटेल नगरचा रहिवासी होता.`
याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. डीजीबी रोड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फॉरेन्सिक टीमने घटनेचा तपास केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मराठी बातम्या/Viral/
Shocking Accident : तरुणावर तिसऱ्या मजल्यावरुन पडला AC, जागेवरच मृत्यूने गाठलं; हृदयद्रावक Video समोर
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement