TRENDING:

10 सेकंदाच्या मिठीने सगळं उद्ध्वस्त केलं! बड्या कंपनीच्या सीईओच्या आयुष्यात मोठी उलथापालथ

Last Updated:

CEO HR Coldplay Concert Video : अ‍ॅस्ट्रोनॉर्मचे सीईओ अँडी बायर्न एचआर हेड क्रिस्टिन कॅबोटसह कोल्डप्लेच्या कॉन्सर्टमध्ये रोंमान्स करताना दिसले. किस कॅममुळे त्यांच्या अफेअरची पोलखोल झाली आणि त्या एका व्हिडीओने त्यांचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : 2 दिवसांपासून एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. एका बड्या कंपनीच्या अधिकाऱ्याने एका महिलेला मिठी मारतानाचा हा व्हिडीओ. अमेरिकेतील टेक कंपनी अ‍ॅस्ट्रोनॉर्मचे सीईओ अँडी बायर्न कंपनीची एचआर हेड क्रिस्टिन कॅबोटसह कोल्डप्लेच्या कॉन्सर्टमध्ये रोंमान्स करताना दिसले. किस कॅममुळे त्यांच्या अफेअरची पोलखोल झाली आणि त्या एका व्हिडीओने त्यांचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे.
News18
News18
advertisement

असे काही लोक आहेत ज्यांचे विवाहबाह्य संबंध, ऑफिसमध्येच कुणासोबत तरी रिलेशन असतं. पण असे रिलेशन लपूनछपून असतात ते जगासमोर येत नाहीत. अ‍ॅस्ट्रोनॉर्म कंपनीचे सीईओ अँडी बायर्न यांचंही असंच एक्स्ट्रामॅरिटल अफेअर. पण बोस्टनमध्ये कोल्डप्लेच्या कॉन्सर्टमध्ये त्यांचं अफेअर अख्ख्या जगासमोर आलं. अँडी बायरन त्यांच्याच कंपनीतील एचआर क्रिस्टिन कॅबोटला मिठी मारताना दिसले.

2 लग्न, 5 मुलं, तरीही 17 वर्षे लहान व्यक्तीच्या प्रेमात पडली, भेटायला गेली आणि घडलं असं की...

advertisement

जसा किस कॅम त्यांच्याकडे फिरला तसा त्यांचा रोमान्स या कॅमेऱ्यात कैद झाला आणि सगळ्यांनी त्यांना पाहिलं. बायरन मागे आणि क्रिस्टिन पुढे. बायरन यांनी क्रिस्टिनला मागून मिठी मारली होती. क्रिस्टिनच्या छातीवर दोघांचेही हात एकमेकांच्या हातांवर होते. क्रिस्टिन किंचित मागे बायरनच्या खांद्यावर झुकलेली दिसते आहे. दोघंही गाण्याच्या तालावर झुलत होते.

इतक्यात किस कॅम त्यांच्यावर गेला यावेळी कोल्डप्ले बँडमधील सिंगर क्रिस मार्टिन मोठ्याने ओरडला. अरे या दोघांना पाहा, अरे काय?. त्याच क्षणी त्यांनी आपले चेहरे लपवले. तेव्हा मार्टिनने त्यांची खिल्ली उडवली, "एकतर त्यांचे प्रेमसंबंध आहेत किंवा ते खूप लाजाळू आहेत.", असं तो म्हणाले. ज्यामुळे लोक हसू लागले.

advertisement

advertisement

आपल्याला सगळे पाहत आहेत हे लक्षात येताच दोघांनीही स्वतःला लपवण्याचा प्रयत्न केला. क्रिस्टिनने आपला चेहरा हातांनी झाकला त्यानंतर तिने कॅमेऱ्याकडे पाठच गेली. तर बायरन थेट खालीच बसले. यावरून दोघांच्याही अफेअरबाबत कुणालाच माहिती नव्हतं. दोघंही लपूनछपून कॉन्सर्टमध्ये आले होते हे स्पष्ट होतं.

लग्न, दोन मुलं आणि नंतर धक्कादायक सत्य; पतीबद्दल असं काही समजलं की बायको हादरली

advertisement

अवघ्या 13 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. पण या व्हिडीओने ब्रायनच्या आयुष्याची वाट लागली आहे. त्यांच्या पत्नीने सोशल मीडियावरील त्यांच्या प्रोफाइलमधून बायरन हे आडनाव काढून टाकलं आहे. यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात तणाव निर्माण झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसंच बायरन यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.

मराठी बातम्या/Viral/
10 सेकंदाच्या मिठीने सगळं उद्ध्वस्त केलं! बड्या कंपनीच्या सीईओच्या आयुष्यात मोठी उलथापालथ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल