2 लग्न, 5 मुलं, तरीही 17 वर्षे लहान व्यक्तीच्या प्रेमात पडली, भेटायला गेली आणि घडलं असं की...
- Published by:Priya Lad
Last Updated:
Relationship News : 2 लग्न झालेली 5 मुलांची आई 17 वर्षे लहान व्यक्तीच्या प्रेमात पडली. तिने त्याला भेटण्यासाठी 15000 किलोमीटरचा प्रवासही केला. पण त्यानंतर तिच्या आयुष्यात मोठी घटना घडली.
नवी दिल्ली : प्रेमाला वय नसतं असं म्हणतात. प्रेम कधी कुठे, कसं, कुणावर होईल माहिती नाही. प्रेमात कपल कितीतरी अडचणींना सामोरं जातात. प्रेमाचा असाच एक किस्सा सध्या व्हायरल होत आहे. ज्यात चक्क दोन लग्न झालेली 5 मुलांची आई 17 वर्षे लहान व्यक्तीच्या प्रेमात पडली. तिने त्याला भेटण्यासाठी 15000 किलोमीटरचा प्रवासही केला. पण त्यानंतर तिच्या आयुष्यात मोठी घटना घडली.
ऑस्ट्रेलियातील हे प्रकरण आहे. अँजेला पीटर्स असं या महिलेचं नाव ती 56 वर्षांची आहे. अँजेलाने वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी तिची पहिली मुलगी शीनाला जन्म दिला. चार वर्षांनंतर तिला हीथ नावाचा मुलगा झाला. ती 24 वर्षांची असताना त्यांचं नातं तुटलं आणि अँजेला एकटी पडली. त्यानंतर तिने पुन्हा लग्न केलं. या लग्नापासून अँजेलाला तीन मुलं झाली - कल्लम, डाना आणि गॅब्रिएल. पण अँजेला या लग्नावरही खूश नव्हती. वयाच्या 51 व्या वर्षी तिने 2019 मध्ये तिच्या दुसऱ्या पतीला घटस्फोट दिला.
advertisement
2019 मध्ये दुसऱ्या लग्नापासून घटस्फोट घेतल्यानंतर अँजेला एकटेपणा सहन करू शकली नाही. यातून सुटका मिळवण्यासाठी तिने एका डेटिंग वेबसाइटवर एक अकाउंट तयार केलं. तिथं ती नायजेरियातील 47 वर्षीय एमेकाशी बोलली. एमेकाने अँजेलासोबतचा त्याच्या कुटुंबाचा फोटो शेअर केला, ज्यामध्ये त्याचा 34 वर्षीय धाकटा भाऊ ब्राइट होता. ज्याला पाहून ती त्याच्या प्रेमात पडली. अँजेलाने एमेकाकडून ब्राइटचा नंबर घेतला आणि पहिल्याच कॉलमध्ये तिच्या भावना व्यक्त केल्या. अशा प्रकारे अँजेलाची तिसरी प्रेमकहाणी 2020 मध्ये सुरू झाली.
advertisement
अँजेला आणि ब्राईटमधील प्रेम इतकं वाढलं की दोघांनीही भेटण्याचा प्लॅन केला. अँजेला तिच्या 17 वर्षांच्या लहान प्रियकराला भेटण्यासाठी नायजेरियाला 15000 किमी प्रवास करून गेली. दोघंही 9 महिने एकत्र राहिले. या काळात अँजेलाने ब्राईटला सांगितलं की तिची मासिक पाळी थांबली आहे आणि ती नैसर्गिकरित्या आई होऊ शकत नाही. त्यानंतरही ब्राईटने तिच्याशी लग्न केलं. वयाच्या 56 व्या वर्षी अँजेलाने आयव्हीएफच्या मदतीने जुळ्या मुलांना जन्म दिला. आता अँजेला 7 मुलांची आई आणि 12 नातवंडांची आजी बनली आहे.
Location :
Delhi
First Published :
July 19, 2025 12:00 PM IST
मराठी बातम्या/Viral/
2 लग्न, 5 मुलं, तरीही 17 वर्षे लहान व्यक्तीच्या प्रेमात पडली, भेटायला गेली आणि घडलं असं की...