चिमुकलीने आईला बाबांबाबत असा कोणता प्रश्न विचारला, ऐकूनच लोक म्हणाले, 'ही AI पेक्षा खतरनाक'

Last Updated:

Girl Video Viral : एका मुलीने तिच्या आईला आपल्या वडिलांबाबत विचारलेला हा प्रश्न. तिचा प्रश्न ऐकून फक्त तिचे आईबाबाच नव्हे तर हा व्हिडीओ पाहणाऱ्या प्रत्येकाला धक्का बसला आहे.

News18
News18
नवी दिल्ली : लहान मुलांना खूप प्रश्न पडत असतात. ते कधी काय विचारतील याचा नेम नाही. काही वेळा त्यांचे प्रश्न इतके विचित्र असतात की त्याचं काय उत्तर द्यावं असा प्रश्न पालकांना पडतो. असाच विचित्र प्रश्न विचारणाऱ्या चिमुकलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या मुलीचा व्हिडीओ पाहून लोकांनी तिला एआयपेक्षा खतरनाक म्हटलं आहे.
एका मुलीने तिच्या आईला आपल्या वडिलांबाबत विचारलेला हा प्रश्न. तिचा प्रश्न ऐकून फक्त तिचे आईबाबाच नव्हे तर हा व्हिडीओ पाहणाऱ्या प्रत्येकाला धक्का बसला आहे. आता असं या मुलीने नेमका काय प्रश्न विचारला हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक पिंक कलरचा ड्रेस घातलेली ही चिमुकली. व्हिडीओत ती एकटीच दिसते आहे पण मागे तिच्या आईचा आवाज ऐकू येत आहे. मुलगी आईला प्रश्न विचारते, त्यावर तिची आई बोलताना दिसते आहे.
advertisement
या व्हायरल व्हिडिओमध्ये मुलगी तिच्या आईला अगदी निरागसपणे विचारते, तुझा नवरा माझे वडील कसे? आई मुलीच्या या प्रश्नावर हसते आणि आपल्या नवऱ्याला म्हणजे मुलीच्या वडिलांना याचं उत्तर द्यायला सांगते. तेव्हा मुलगी मी तुला प्रश्न विचारला आहे, असं म्हणून आईलाच उत्तर द्यायला सांगते. तेव्हा तिची आई हसून म्हणाली, मला स्वतःला माहित नाही बेटा. मग मुलगी तिच्या वडिलांनाही तोच प्रश्न विचारते. व्हिडीओत तिच्या वडिलांना दाखवण्यात आलं आहे. मुलीचा प्रश्न ऐकून त्यांना काय सांगावं तेच सूचत नाही. ते फक्त तिच्याकडे पाहतच राहतात.
advertisement
मुलीचा पुढचा प्रश्न आणखी मजेदार आहे. ती म्हणते जर मम्मीची आई वेगळी आहे आणि पप्पांची आई वेगळी आहे, तर तुम्ही दोघं एकत्र का राहता? हे ऐकून पालकांना धक्काच बसला, ते दोघं गप्प झालं. मुलगी इथेच थांबली नाही. तर घर गवंडीने बांधलं होतं, मग पप्पा त्यात का राहत आहेत? असा प्रश्नही तिने केला.
advertisement
हा व्हिडिओ @SinghKinngSP या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. युझर्स मुलीच्या प्रश्नांच्या सर्जनशीलतेने प्रभावित झाले आहेत. एका युझरने तिला लग्नाचा अल्बम दाखवू नका, नाहीतर ती गुप्तहेर होईल, असं म्हटलं आहे  तर दुसऱ्या युझरने ही मुलगी एआयपेक्षा वेगवान असल्याचं म्हटलं आहे.
advertisement
तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
view comments
मराठी बातम्या/Viral/
चिमुकलीने आईला बाबांबाबत असा कोणता प्रश्न विचारला, ऐकूनच लोक म्हणाले, 'ही AI पेक्षा खतरनाक'
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement