TRENDING:

40000000000 रुपयांचा घोटाळा! मल्ल्या आणि नीरवचाही बाप निघाला बंकीम, बँकेत अशी फेरफार, डोकं चक्रावून जाईल

Last Updated:

भारतीय वंशाचा उद्योगपती बंकिम ब्रह्मभट्टवर अंदाजे 4000 कोटींच्या कर्ज घोटाळ्याचा आरोप आहे. जगातील सर्वात मोठ्या कर्ज देणाऱ्यांपैकी एक असलेल्या ब्लॅकरॉकची त्याने फसवणूक केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांची प्रकरणं तुम्हाला माहितीच आहेत. आता असंच एक प्रकरण उघडकीस आलं आहे. भारतीय वंशाचा बिझनेसमन बंकिम ब्रह्मभट्ट, ज्याच्यावर अंदाजे 500 दशलक्ष डॉलर्स म्हणजे तब्बल 4000 कोटी रुपयांची कर्ज फसवणूक केल्याचा आरोप आहे. जगातील सर्वात मोठ्या कर्ज देणाऱ्यांपैकी एक असलेल्या ब्लॅकरॉकची त्याने फसवणूक केल्याचं उघड झालं आहे.
News18
News18
advertisement

बंकिम ब्रह्मभट्ट अमेरिकेतील ब्रॉडबँड टेलिकॉम आणि ब्रिजव्हॉइसचा मालक. बंकाई ग्रुपचा संस्थापक आहे. त्याला दूरसंचार उद्योगात 30 वर्षांहून अधिक अनुभव आहे. त्याच्या कंपन्या जगभरातील दूरसंचार कंपन्यांना पायाभूत सुविधा आणि नेटवर्क सेवा पुरवतात.

ट्रेनमध्ये Reels पाहणं पडू शकतं महागात! मोबाईल वापरण्यापूर्वी रेल्वेचे हे नियम वाचाच, नाहीतर पस्तावाल

वॉल स्ट्रीट जर्नल (WSJ) मधील एका वृत्तानुसार,  ऑगस्ट 2025 मध्ये ब्लॅकरॉक आणि इतर बँकांनी ब्रह्मभट्टच्या कंपन्यांवर 500 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त कर्ज असल्याचा आरोप करत खटला दाखल केला. ब्लॅकरॉकची खाजगी क्रेडिट शाखा एचपीएस इन्व्हेस्टमेंट पार्टनर्स आणि इतर अनेक अमेरिकन कर्जदारांनी असा दावा केला आहे की ते मोठ्या फसवणुकीचे बळी ठरले आहेत.

advertisement

एचपीएसने पहिल्यांदा सप्टेंबर 2020 मध्ये ब्रह्मभट्टच्या कंपनीला कर्ज दिलं आणि ऑगस्ट 2024 पर्यंत त्याचे एकूण एक्सपोजर 430 दशलक्ष डॉलर्स झाले. ब्लॅकरॉकने अलीकडेच खाजगी कर्ज बाजारात विस्तार करण्यासाठी एचपीएस इन्व्हेस्टमेंट पार्टनर्स घेतले त्याचवेळी हे प्रकरण समोर आलं आहे. फ्रेंच बँक बीएनपी परिबासनेही यापैकी निम्म्या कर्जांना वित्तपुरवठा केला.

Indian Railway Kinnar : ट्रेनमध्ये किन्नर जबरदस्ती पैसे मागतात, काय करायचं? रेल्वेने दिला उपाय, पुन्हा तुमच्याकडे फिरकणार नाहीत

advertisement

रिपोर्टनुसार जेव्हा कर्ज प्रक्रिया सुरू झाली, तेव्हा HPS ने कंपनीचे ऑडिट करण्यासाठी डेलॉइटला नियुक्त केलं. नंतर अकाउंटिंग फर्म CBIZ कडून वार्षिक ऑडिट करण्यात आलं. जुलै 2025 मध्ये, HPS च्या एका कर्मचाऱ्याला काही संशयास्पद ईमेल पत्ते आढळले जे ग्राहकांचे असल्याचं कथितपणे आढळले.

तपासात असं दिसून आलं की हे पत्ते खऱ्या टेलिकॉम कंपन्यांचे अनुकरण करणाऱ्या बनावट डोमेनवरून तयार केले गेले होते. जेव्हा ही माहिती ब्रह्मभट्टच्या लक्षात आणून देण्यात आली तेव्हा त्यांनी सुरुवातीला ती साधी चूक म्हणून फेटाळून लावली आणि नंतर फोन कॉल्सना उत्तर देणं बंद केलं. जेव्हा एचपीएस अधिकारी न्यू यॉर्कमधील गार्डन सिटी येथील त्याच्या ऑफिसमध्ये पोहोचले तेव्हा त्यांना ते बंद दिलं. तिथं कुणीच नव्हतं. स्थानिकांनी सांगितलं की, अनेक आठवड्यांपासून तिथं कोणताही कर्मचारी नव्हता.

advertisement

कुली नंबर 1, सोबत 2 बॉडीगार्ड! रिल नाही हे रिअल आहे; 200 रुपये कमवणाऱ्या कुलीला अंगरक्षक का?

ब्रह्मभट्टच्या कंपन्यांच्या खात्यांमध्ये बनावट ग्राहक खाती आणि बनावट पावत्या दाखवून लाखो डॉलर्स कर्ज मिळवल्याचा आरोप आहे. त्याने या काल्पनिक डेटाचा वापर कर्ज तारण म्हणून केला. त्याने असंख्य बनावट ग्राहक खाती तयार केली आणि कर्जाची रक्कम भारत आणि मॉरिशससारख्या देशांमध्ये हस्तांतरित केली. 12 ऑगस्ट रोजी ब्रह्मभट्टने दिवाळखोरी जाहीर केली आणि त्याच्या कंपन्यांनी चॅप्टर 11 अंतर्गत पुनर्रचना सुरू केली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Afghan Apples: ‘पहलगाम’नंतर अफगाणी सफरचंद समुद्रमार्गे भारतात, पुण्यात दर किती?
सर्व पहा

अहवालात असं म्हटलं आहे की फसवणूक उघडकीस आल्यानंतर ब्रह्मभट्टचं लिंक्डइन प्रोफाइल काढून टाकण्यात आलं आहे आणि सध्या हा खटला अमेरिकेच्या न्यायालयात प्रलंबित आहे.

मराठी बातम्या/Viral/
40000000000 रुपयांचा घोटाळा! मल्ल्या आणि नीरवचाही बाप निघाला बंकीम, बँकेत अशी फेरफार, डोकं चक्रावून जाईल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल