Indian Railway : ट्रेनमध्ये Reels पाहणं पडू शकतं महागात! मोबाईल वापरण्यापूर्वी रेल्वेचे हे नियम वाचाच, नाहीतर पस्तावाल

Last Updated:
Indian Railway Mobile Rule : जर तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही खूप महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे प्रवासात मोबाईल वापरण्याबाबत रेल्वेने काही नियम बनवलेले आहेत.
1/5
प्रवासात बहुतेक प्रवासांच्या हातात तुम्ही मोबाईल पाहिला असेल. कुणी गाणी ऐकतं, कुणी सोशल मीडियावर रिल्स पाहतं, कुणी व्हिडीओ पाहतं, कुणी फिल्म तर कुणी सीरियल पाहतं. पण ट्रेन प्रवासात तुम्ही मोबाईल वापरत असा तर मात्र सावध राहा कारण ट्रेनमध्ये मोबाईल वापरण्याबाबत रेल्वेचे काही नियम आहेत, या नियमाचं पालन न करणं तुम्हाला महागात पडू शकतं.

advertisement
2/5
रात्रीच्या वेळी गाड्यांमध्ये शांतता राखणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण बरेच प्रवासी लांब पल्ल्याचा प्रवास करतात आणि त्यांना झोपेची आवश्यकता असते. प्रत्येक प्रवाशाला त्यांच्या प्रवासादरम्यान चांगली झोप आणि विश्रांती मिळावी या उद्देशाने एक नियम बनवण्यात आलेला आहे.

3/5
रेल्वे कायदा 1989 च्या कलम 145 नुसार जर एखाद्या प्रवाशाने ट्रेनमधील शांतता भंग केली, आवाज केला किंवा इतरांना त्रास दिला तर तो गुन्हा मानला जातो. त्यामुळे या नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांना कठोर कारवाईला सामोरं जावं लागेल. रेल्वे प्रथम इशारा देईल किंवा 500 ते 1000 रुपयांपर्यंत दंड आकारेल.

4/5
रात्री 10 वाजताचा हा नियम. नियमानुसार रात्री 10 नंतर ट्रेनमध्ये शांतता राखणं बंधनकारक आहे. रात्री 10 नंतर इतर प्रवाशांना त्रास देणारी कोणतीही कृती करू नये. जर तुम्ही रात्री 10 नंतर मोठ्या आवाजात रिल्स पाहत असाल, फोनवर मोठ्याने बोलत असाल किंवा फोनचा लाइट जास्त असेल ज्यामुळे इतर प्रवाशांना त्रास होत असेल  तर तुम्हाला ही शिक्षा होऊ शकते. रेल्वेने स्पष्टपणे सांगितलं आहे की रात्री 10 नंतर मोठ्या आवाजात फोन संभाषण, संगीत किंवा व्हिडिओ कॉल टाळावेत आणि रात्रीच्या वेळी नाइट लाइट्स वगळता सर्व रेल्वे दिवे बंद करावेत.

5/5
रेल्वे नियमांनुसार हेडफोनशिवाय मोठ्याने संगीत ऐकणं किंवा व्हिडिओ प्ले करणं बेकायदेशीर आहे. जर या वर्तनामुळे इतर प्रवाशांना त्रास होत असेल तर ते उल्लंघन ठरेल. उदाहरणार्थ जर तुम्ही रात्री मोठ्या आवाजात टीव्ही शो पाहत असाल आणि तुमच्या शेजारी बसलेल्या प्रवाशाने तक्रार केली तर तुम्हाला प्रथम एक चेतावणी मिळेल. जर तुम्ही तरीही ऐकलं नाही तर तुम्हाला दंड होऊ शकतो. (सर्व फोटो : AI Generated)

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement