एका रुममध्ये हा एकटा मुलगा डॉगसोबत होता. खोलीतून विचित्र आवाज येत होता. तो ऐकून आई त्या रूमच्या दिशेने गेली. तिने दरवाजा उघडून पाहिलं आणि ती पुरती हादरलीच. ती मोठ्याने ओरडली. असं या खोलीत काय होतं हे पाहण्याची उत्सुकता आता तुम्हालाही असेल.
advertisement
मुलाच्या हातात इलेक्ट्रिक रेझर होता. मुलाने कुत्र्यासोबत जे केलं होतं, त्याची कल्पनाही कुणी केली नसेल. कुत्र्याच्या डोक्यावर केसच नव्हते. मुलाने कुत्र्याच्या डोक्यावरील केस रेझरने काढून टाकले होते. हे पाहून आई आधी शॉक झाली पण नंतर तिला हसूही आवरलं नाही. डॉगच्या चेहऱ्यावरील हावभावही पाहण्यासारखे आहेत.
दरम्यान या व्हिडीओवर अनेक कमेंट आल्या आहेत. काहींनी आपल्या बालपणीच्या आठवणी परत आल्याचं म्हटलं तर काहींना त्या कुत्र्याची द्या आली आहे. तर काहींनी मुलांच्या हातात इलेक्ट्रिक रेझरसारख्या वस्तू देऊ नका, धोकादायक ठरू शकतं, असं सांगत चिंता व्यक्त केली आहे.
