एका कपलचा हा व्हिडीओ. ज्यात बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला गिफ्ट देतो. आता कपल म्हटलं की त्यांच्या गिफ्ट देणंघेणं आलंच. यात काय नवीन असं तुम्ही म्हणाल. पण या व्हिडीओत हे गिफ्ट इतकं खास आहे की तुम्ही विचारही केला नसाल. असं गिफ्ट कदाचित कोणत्याच बॉयफ्रेंडने आपल्या गर्लफ्रेंडला दिलं नसावं. असं गिफ्ट देण्याचा विचारही कुणी करणार नाही.
advertisement
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एका पुरुषाचा हात दिसतो आहे. त्याने मूठ झाकली आहे. या मुठीत काहीतरी लपवून ठेवलं आहे. त्यानंतर एका मुलीचा हात दिसतो. पुरुष आपली मूठ उघडतो. मुलगी त्या पुरुषाच्या हातातील वस्तू घेते. ही वस्तू काय तर चक्क चुनातंबाखूची छोटी डब्बी आहे. तीसुद्धा चांदीची. मुलगी हे गिफ्ट अगदी प्रेमाने हातात घेते. त्याचं झाकण उघडून दोन्ही बाजून ती दाखवते.
एकंदर व्हिडीओ पाहता गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड दोघंही खैनी प्रेमी आहेत असंच दिसतं. हा व्हिडीओ पाहिल्यावर यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
बायकोने नपुंसक म्हटलं तर नवऱ्याने व्हर्जिनिटीवर घेतली शंका, हायकोर्टाने असा निर्णय दिला की...
@fashion_darbar_hub_ हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ व्हायरल म्हणून दाखवण्यात आला आहे. तंबाखूसारखं व्यसन वाईटच आहे. न्यूज18मराठी अशा व्यसनांना समर्थन देत नाही. तसंच अशा गोष्टींना प्रोत्साहन देण्याचा उद्देशही न्यूज18मराठीचा नाही.