बिझनेसनच्या नावाने नवरा-बायकोचा अश्लील धंदा! आलिशान घरात पॉर्न स्टुडिओ, 4 तास शूटिंग, 22 कोटींची कमाई

Last Updated:

Noida couple offensive video : ईडीच्या छापेमारीवेळीसुद्धा अश्लील व्हिडीओ शूट सुरू होतं. ईडीच्या छाप्यात बंगल्यात वरच्या मजल्यावर एक प्रोफेशनल वेबकॅम स्टुडिओ मिळाला. जिथं हायटेक सेटअप होतं.

News18
News18
नवी दिल्ली : नोएडातील अश्लील व्हिडीओ प्रकरणात नवनवे खुलासे होत आहेत. याबाबत आता बरीच माहिती समोर येत आहेत. ईडीला 22 कोटी रुपयांच्या फॉरेन फंडिगबाबत माहिती मिळाली. त्याबाबत तपासासाठी 28 मार्च रोजी ईडीने नोएडातील सेक्टर 105 मध्ये एका आलिशान बंगल्यावर धाड टाकली. तिथं एक नवरा-बायकोच्या अश्लील व्हिडीओचा धंदा उघड झाला.
उज्जवल किशोर आणि अंजू श्रीवास्तव हे नवरा-बायको एका आलिशान बंगल्यात राहत होते. माहितीनुसार त्यांनी हा दोन मजली बंगला भाड्याने घेतला होता. नवरा-बायकोने मिळून सबडिजी वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी बनवली होती. कंपनी जाहीरात मार्केटिंग रिसर्च आणि ओपनियन पोलशी संबंधित असल्याचं सांगितलं.
advertisement
त्यांनी सोशल मीडियावर जाहिरात देऊन शूटिंगच्या नावाने मॉडेल्सची भरती केली. ग्लॅमरस लाइफस्टाईल आणि महिन्याला एक-दोन लाखांचं आमिष दाखवत 500 तरुणी त्यांनी हायर केल्या. सुरुवातीला नॉर्मल शूट नंतर हळूहळू त्यांना अश्लील व्हिडीओ शूट करायला भाग पाडलं.
बंगल्यात नको तो धंदा
ईडीच्या छाप्यात बंगल्यात वरच्या मजल्यावर एक प्रोफेशनल वेबकॅम स्टुडिओ मिळाला. जिथं हायटेक सेटअप होतं. म्हणजेइथंच शूटिंग व्हायचं. छापेमारीवेळीसुद्धा शूट सुरू होतं.
advertisement
चौकशीत शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कपल फार कुणाशी बोलत नसे. शेजाऱ्यांशी संबंध ठेवत नव्हते. दिवसातून 2-3 महिला इथं यायच्या. 4 तासांनी त्या निघून जायच्या. कपल परदेशातून आलं होतं तर या महिला त्यांच्या ओळखीच्या असाव्यात असं त्यांना वाटलं. बहुतेक मॉडेल्स सकाळी 11 ते दुपारी 2 च्या दरम्यान यायच्या. 4 तासांनी त्या निघून जायच्या. त्यामुळे हे 4 तास इथं शूटिंग व्हायचं अशी शक्यता वर्तवली जाते आहे.
advertisement
परदेशी वेबसाईटवर अपलोड
कपल परदेशी वेबसाईटला आक्षेपार्ह व्हिडीओ आणि वेबकॅम शो विकत होते. साइप्रसची कंपनी टेक्नियस लिमिटेडसोबत करार केला होता. ही कंपनी एक्हॅम्सटर, स्ट्रिपचॅट अशा अश्लील वेबसाईट चालवते.   अश्लील व्हिडीओ बनवून हे कपल या कंपन्यांना विकायचे.
मॉडेल्सना तीन कॅटेगिरीत विभागलं होतं. त्यानुसारच या मॉडेल्सना पैसे मिळायचे आणि ग्राहकांकडूनही तसेच पैसे आकारले जायचे. याबदल्यात कपलला मोठी रक्कम मिळत होती. त्यातील 25 टक्के ते मॉडेल्सला देत होते. कपलने जवळपास 22 कोटी रुपये कमवले. 
view comments
मराठी बातम्या/Viral/
बिझनेसनच्या नावाने नवरा-बायकोचा अश्लील धंदा! आलिशान घरात पॉर्न स्टुडिओ, 4 तास शूटिंग, 22 कोटींची कमाई
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement