कानपूर जिल्ह्यातील शिवराजपूर पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात राहणारी ही किशोरवयीन मुलगी. तिचं कुटुंब कानपूरला एका नातेवाईकांच्या घरातील लग्न समारंभासाठी गेलं होतं. 13 डिसेंबरला ती घरी एकटीच होती. याच संधीचा फायदा घेत तिचा बॉयफ्रेंड रात्री तिच्या घरी पोहोचला. कुलदीप कुमार उर्फ शोभित असं त्याचं नाव. तो तरुणीच्या गावापासून 20 किमी अंतरावर असलेल्या नेवाडा गावचा रहिवासी आहे.
advertisement
जिथं अंत्यसंस्कार केले तिथंच केली बर्थडे पार्टी; अन् भयानक घडलं
तरुणी संपूर्ण रात्र बॉयफ्रेंडसोबोत घालवली. त्याने तिचे कपडे काढले. शारीरिक संबंध ठेवण्यासाठी त्याने तिचे कपडे काढले. सुमारे सात तास तिला विवस्त्र ठेवलं. त्याने शक्ती वाढवणाऱ्या गोळ्या घेतल्या आणि दोनदा शारीरिक संबंध ठेवले. तरुणीला थंडी लागली आणि तिचं शरीर ताठ झालं. तिची अवस्था पाहून बॉयफ्रेंड पळून गेला. मुलीचा मृत्यू झाला.
14 डिसेंबर रोजी मुलीचं कुटुंब घरी परतलं. सकाळी येताच त्यांनी रूमचा दरवाजा उघडला. तेव्हा ते हादरलेच. समोरचं दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. मुलीचा मृतदेह खोलीत बेडवर अर्धनग्न अवस्थेत पडला होता. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांच्या फॉरेन्सिक टीमने घटनास्थळ गाठून पुरावे गोळा केले.
मृत मुलगी तिच्या भाचीसोबत घरी होती. भाचीनेच प्रियकर घरी आल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी प्रियकराला अटक केली आहे.
Chanakya Niti : बायको असताना पुरुष दुसऱ्या महिलेकडे आकर्षित का होतात?
आरोपी कुलदीपने पोलीस चौकशीत सांगितलं की, त्याची गर्लफ्रेंड घरी एकटीच होती. शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास तो तिच्या घरी पोहोचला. रात्रभर थांबला. पण सकाळी तब्येत बिघडू लागली म्हणून त्याने तिथून पळ काढला.
रविवारी तीन डॉक्टरांच्या समितीने मुलीच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टेम केलं. डीसीपी पश्चिम राजेश सिंह म्हणाले, 'आरोपीविरुद्ध बलात्कार आणि पॉक्सो कायद्याच्या कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला असून त्याला तुरुंगात पाठवण्यात आलं आहे.'