advertisement

जिथं अंत्यसंस्कार केले तिथंच केली बर्थडे पार्टी; अन् भयानक घडलं

Last Updated:

जन्मदिनी वाढदिवस साजरा केला जातो तर मृत्यू झाल्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातात. दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणी होतात. पण एका ठिकाणीच या दोन्ही गोष्टी करण्यात आल्या आहेत. यानंतर जे घडलं ते भयानक आहे.

प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
नवी दिल्ली : जन्म आणि मृत्यू हे आयुष्याचं चक्र. ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यूही होतोच. जन्म चांगला तर मृत्यू वाईट समजला जातो. जिथं मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातात त्या जागी तसं फार कुणी थांबत नाही. असं असताना एका प्रकरणात मात्र अंत्यसंस्कार झाले तिथंच बर्थडे पार्टी करण्यात आली आहे.
जन्मदिनी वाढदिवस साजरा केला जातो तर मृत्यू झाल्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातात. दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणी होतात. पण यूकेमध्ये एका ठिकाणीच या दोन्ही गोष्टी करण्यात आल्या आहेत. यानंतर जे घडलं ते भयानक आहे.
मॅनचेस्टरच्या बॅगुलीमधील विंस्टन कंजरव्हेटिव्ह क्लबध्ये 4 नोव्हेंबर रोजी अंत्यसंस्काराचा कार्यक्रम आणि बर्थडे पार्टी एकत्र ठेवण्यात आली. यानंतर इथं हाणामारी झाली. यात चार लोक जखमी झाले आहेत, त्यांना रुग्णायात दाखल करण्यात आलं आहे.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हाणामारीदरम्यान लोकांनी डोकं आणि पायावर हल्ला केला. टॉयलेटचंही नुकसान केलं आहे.
यानंतर मॅनचेस्टर काऊन्सिने क्लबची सुरक्षा वाढवण्याचे आदेश दिले. 60 पेक्षा अधिक लोक असलेल्या इव्हेंट्सवेळी एक प्रशिक्षित सुरक्षा गार्ड आणि सीसीटीव्हीची व्यवस्था करण्यास सांगण्यात आलं आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
जिथं अंत्यसंस्कार केले तिथंच केली बर्थडे पार्टी; अन् भयानक घडलं
Next Article
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement