उत्तर प्रदेशाच्या कानपूर जिल्ह्यातील ही घटना. इथली बुशरा नावाच्या महिलेची 2023 मध्ये नायब अली नावाच्या व्यक्तीशी भेट झाली. त्यानंतर दोघंही फोनवर बोलू लागले. दोघांमधील जवळीक वाढत गेली. दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. नायबने बुशराची त्याच्या कुटुंबातील सदस्यांशी ओळख करून दिली. यानंतर बुशराने तिच्या घरातून 5 लाख रुपये आणले आणि नायबला दिले. नायब बुशरावर लग्नासाठी दबाव टाकू लागला. शेवटी दोघांनी कोर्टात लग्न केलं. दोघंही भाड्याच्या घरात राहू लागले.
advertisement
बायकोने नपुंसक म्हटलं तर नवऱ्याने व्हर्जिनिटीवर घेतली शंका, हायकोर्टाने असा निर्णय दिला की...
लग्नानंतर नायब बुशरासोबत असं काही करत होता की त्याने त्याचा स्वप्नातही विचार केला नसेल. लग्नाच्या पहिल्या रात्रीपासूनच नायबने बुशरासोबत नको तेच करायला सुरुवात केली. बुशराने पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीत तिनं सांगितलं की, लग्नाच्या पहिल्या रात्रीपासूनच तिचा पती नायब तिला झोपेच्या गोळ्या खायला देऊ लागला. तिने आरोप केला की नायबने तिचा फोन आणि दागिने हिसकावून घेतले. जेव्हा तिने दागिने आणि फोन परत मागितले तेव्हा नायब तिला मारहाण करू लागला. मग त्यांच्यात रोज भांडण होऊ लागली. नायब बुशराला शिवीगाळ करू लागला.
काही दिवस एकत्र राहिल्यानंतर नायब बुशराला सोडून गेला. आपली फसवणूक झाली आहे हे बुशराला समजलं आणि तिनं पोलिसांकडे धाव घेतली. चकेरी पोलीस ठाण्यात तिने गुन्हा दाखल केला. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चौकशीनंतर कारवाई केली जाईल असं पोलिसांनी सांगितलं आहे.