TRENDING:

Suhagraat News : सुहागरातआधी नवरदेवाला फुटला घाम, वडिलांकडे धावत गेला, म्हणाला, बाबा... बाबा...

Last Updated:

Suhagraat News : लग्नाच्या पहिल्या रात्रीच्या आधी एका वधूने वराला असा सरप्राईज दिला की वराला धक्का बसला. तो धावत आपल्या वडिलांकडे गेला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
भोपाळ : मध्य प्रदेशातील राजगडमध्ये एक अशी घटना समोर आली आहे, ज्यामुळे सर्वांनाच घाम फुटला आहे. एका सामान्य माणसाचं लग्न मोठ्या थाटामाटात साजरं झालं. पण सुहागरात होण्यापूर्वी वधूने वराला असं सरप्राईज दिलं की वरालाही धक्का बसला. सरप्राईज मिळाल्यानंतर वराने त्याच्या वडिलांकडे धाव घेतली.
प्रतीकात्मक फोटो (AI Generated)
प्रतीकात्मक फोटो (AI Generated)
advertisement

खरंतर बंकपुरा गावातील रामगोपाल नावाच्या एका तरुणाचं लग्न अनेक वर्षांपासून होत नव्हतं. कुटुंबीय याबद्दल खूप नाराज होतं. दरम्यान गोकुळ वर्मा नावाचा एक व्यक्ती त्यांच्या गावात आला. त्याने रामगोपालच्या वडिलांना एका मुलीचा फोटो दाखवतो, फोटो पाहिल्यानंतर कुटुंबाला ती मुलगी आवडली.

वधूच्या वडिलांनी लग्नासाठी 2 लाख रुपये मागितले. राम गोपालच्या वडिलांनी कसंबसं त्यांचे दागिने विकून 2 लाख रुपयांची व्यवस्था केली. यानंतर गोकुळ आणि जमनालाल यांनी लग्नाची तारीख निश्चित केली. बेवार येथील अंजनी लाल मंदिरात लग्नाचा सोहळा निश्चित झाला.

advertisement

या गावातील एकाही पुरुषाची होत नाहीये सुहागरात, सगळ्यांना एकच अडचण, इच्छा असूनही सुटेना

23 एप्रिल रोजी वधू दिव्या भगनानी आणि राम गोपाल हरीशसह मंदिरात पोहोचले. लग्नाच्या औपचारिकता पूर्ण केल्यानंतर, मंदिरात विधीनुसार लग्न संपन्न झालं. हारांची देवाणघेवाण झाली, सात फेरे झाले आणि सर्व विधी पूर्ण झाले. या दरम्यान, राम गोपालच्या वडिलांनी गोकुळ आणि जमनालाल यांना दोन लाख रुपये दिले.

advertisement

निघण्याची वेळ येताच गोकुळ आणि जमनालाल म्हणाले की वधूला बाथरूला जायचं आहे. वराचं कुटुंब निघण्याच्या तयारीत व्यस्त होतं. काही वेळ वाट पाहिल्यानंतरही वधू परत आली नाही. गोकुळ आणि जमनालाल तिथं नव्हते. तेव्हा कुटुंबाला समजले की त्यांची फसवणूक झाली आहे. नंतर कळले की वधू लुटेरी दुल्हन होती.

ऐकावं ते नवल! माहेरच्यांनी नवरीला सोनं आणि पैशांसह दिल्या 100 मांजरी, कारण असं की...

advertisement

राम गोपाल यांनी त्यांच्या कुटुंबासह तातडीने बेवार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी लुटेरी दुल्हन, गोकुळ वर्मा आणि जमनालाल वर्मा यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सांगितलं की, तिघांच्या शोधासाठी छापे टाकले जात आहेत, परंतु अद्याप कोणताही सुगावा लागलेला नाही.

मराठी बातम्या/Viral/
Suhagraat News : सुहागरातआधी नवरदेवाला फुटला घाम, वडिलांकडे धावत गेला, म्हणाला, बाबा... बाबा...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल