आयआयटी बाबा, अॅम्बेसेडर बाबा यांच्यानंतर आता ‘बिझनेसमन बाबा’ हे नाव चर्चेत आले आहे. एका व्हिडिओत दिसणाऱ्या या बाबांनी करोडोंचा व्यवसाय सोडून संन्यास स्वीकारल्याचा दावा केला आहे.
2008 पेक्षा वाईट ठरू शकते 2025! गुंतवलेले पैसे आताच काढून घ्या, नाही तर...
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. भगव्या वस्त्रांमध्ये, रुद्राक्षांची माळ घातलेले बिझनेसमन बाबा सांगतात की, ते एकेकाळी तब्बल १,००० कोटींच्या व्यवसायाचे मालक होते. मात्र, इतक्या कोटींची संपत्ती असूनही त्यांना खरे समाधान मिळाले नाही आणि अखेर त्यांनी अध्यात्माचा मार्ग स्वीकारला.
advertisement
‘डेली ओव्हरडोज’ या इंस्टाग्राम पेजवर त्यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात बाबा कुंभ मेळ्यात भक्तांशी संवाद साधताना, गरजू लोकांना शाल आणि साधूंना ब्लँकेट वाटताना दिसत आहेत. अन्य एका व्हिडिओमध्ये त्यांनी असा दावा केला आहे की, ईडीने आपले 500 ते 700 कोटी जप्त केले आहेत.
स्टेशनवरील साइनबोर्डाचा वाद झाला आंतरराष्ट्रीय; मस्कची उडी, प्रकरण नेमके काय?
या व्हिडिओवर अनेक युझर्सच्या प्रतिक्रिया देखील आल्या आहेत. या बाबाचे नाव किंवा बिझनेस कोणता होता त्याचे नाव काय होते याची काहीच माहिती समोर आल्याने अनेकांनी त्यांचा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे.
माघी पौर्णिमेला 1.6 कोटी भाविकांचा स्नानसोहळा
12 फेब्रुवारीला माघी पौर्णिमेच्या निमित्ताने लाखो भक्तांनी त्रिवेणी संगमात स्नान केले. सुमारे 1.6 कोटी भाविकांनी पवित्र स्नान केले. यानिमित्त प्रयागराजमध्ये मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. माघी पौर्णिमेनंतर महिनाभर चालणाऱ्या कल्पवासाचा समारोप झाला असून, साधारणतः 10 लाख साधू कुंभ मेळा सोडून जाण्याची शक्यता आहे.
अंबानी कुटुंबाची महाकुंभात हजेरी
या वर्षीच्या महाकुंभात सामान्य भाविकांप्रमाणेच अनेक सेलिब्रिटी आणि प्रसिद्ध व्यक्तींनी हजेरी लावली. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आपल्या आई कोकिलाबेन अंबानी, मुलगे आकाश आणि अनंत, सुना श्लोका आणि राधिकासह संपूर्ण कुटुंबासह प्रयागराजच्या कुंभ मेळ्यात पोहोचले. त्यांनी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करून स्वामी चिदानंद सरस्वती महाराज यांची भेट घेतली. तसेच, गरजू लोकांमध्ये मिठाई आणि लाइफ जॅकेट्सचे वाटपही केले.